सोलापूर- राज्य सरकारने घेतलेल्या नाईट कर्फ्यूच्या निर्णयाचे स्वागत आहे.मात्र राज्य सरकार दारूच्या व्यापाऱ्यांना परवान्यामध्ये 50% सवलत देते हा महाविकास आघाडीचा कॉमन मिनीमम प्रोग्राम आहे का? असा प्रश्न भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.
सर्वसामान्य जनतेचा कळवळा सरकारला नाही का?
राज्य सरकार विरोधात महाराष्ट्र राज्यची जनता बाहेर रस्त्यावर उतरत आहे.वीज बिल माफीची मागणी करत आहे. पाणी पट्टीबाबत अनेक प्रश्न आहेत. राज्यातील शेतकरी बुडीत निघाला आहे. पण राज्य सरकार या सर्वसामान्य जनतेकडे दुर्लक्ष करून दारूच्या व्यापाऱ्यांना अधिक लक्ष देत, त्यांच्या परवाना मध्ये 50 टक्के सवलत देत आहे. राज्य सरकारला दारूचाच कळवला अधिक आहे. सर्वसामान्य जनतेच्या मात्र नाही. असे चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या.
दारुला थेट सवलत देणे हा महाविकास आघाडीचा कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे का?-
कोरोना वायरसच्या नव्या विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी राज्य शासनाने नाईट कर्फ्यु लागू केला आहे. राज्य सरकारने सध्या राज्यभर पंधरा दिवसांचा नाईट कर्फ्यू लागू केलेला आहे. त्याचा आम्ही स्वागत करतो. हा निर्णय राज्यातील जनतेच्या हिताचा आहे. त्यामुळे त्याचे स्वागतच आहे, मात्र, दारूच्या परवान्यावरती राज्य सरकार थेट 50% ची सवलत देत आहे. त्यामुळं दारू व्यापाऱ्यांचा भलं करणं हा महाविकास आघाडीचा कॉमन मिनीमम प्रोग्राम आहे का, असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला केला.
मास्कविना आढळल्या चित्रा वाघ-
कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे. लस येईपर्यंत तर गर्दी टाळणे, सॅनिटायझरचा उपयोग करणे, स्वतःची काळजी स्वतः घेणे हा एकमेव उपाय आहे. चित्रा वाघ या शहाजी पवार यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यात आल्या होत्या. या लग्न सोहळ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी होती. समारंभात सोशल डिस्टन्सची नियमावली धाब्यावर बसवण्यात आली होती. याबाबत भाजप नेत्या चित्रा वाघ देखील मास्क परिधान न करता लग्न सोहळ्यात वावरताना दिसून आल्या. त्यांना सोशल डिस्टन्सबद्दल विचारले असता, त्यांनी मी लग्न कार्यक्रमात आले आहे, यावर काही बोलणार नाही, असे सांगून उत्तर देण्यास टाळाटाळ केली.
हेही वाचा- यूपीच्या बरेलीमध्ये आणखी एक लव्ह जिहाद? हिंदू मुलासोबत मुस्लीम मुलीचे लग्न
हेही वाचा- रिझर्व्ह बँकेकडून कोल्हापुरातील सुभद्रा बँकेचा परवाना रद्द