ETV Bharat / state

भाजपकडून विधानपरिषदेसाठी रणजितसिंह मोहिते-पाटलांना उमेदवारी जाहीर

नागपुरचे माजी महापौर आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय प्रवीण दटके, बारामतीमधून अजित पवार यांच्याविरोधात निवडणूक लढवलेले गोपीचंद पडळकर, माजी उपमुख्यमंत्री आणि लोकसभेवेळी भाजपात प्रवेश केलेले विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजित सिंह मोहिते पाटील आणि डॉ. अजित घोपछडे यांना भाजपने विधानपरिषद उमेदवारी जाहीर केली आहे.

Ranjit Singh Mohite Patil
रणजित सिंह मोहिते पाटील
author img

By

Published : May 8, 2020, 5:15 PM IST

सोलापूर - भाजपच्या वतीने विधानपरिषदेसाठी माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याने मोहिते-पाटील समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. येत्या 21 मे रोजी विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने आपले 4 उमेदवार जाहीर केले आहेत.

भाजपने पक्षातल्या दिग्गज नेत्यांना संधी देत नव्या उमेदवारांची घोषणा केली आहे. नागपुरचे माजी महापौर आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय प्रवीण दटके, बारामतीमधून अजित पवार यांच्याविरोधात निवडणूक लढवलेले गोपीचंद पडळकर, माजी उपमुख्यमंत्री आणि लोकसभेवेळी भाजपमध्ये प्रवेश केलेले विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजित सिंह मोहिते पाटील आणि डॉ. अजित घोपछडे यांना भाजपने विधानपरिषद उमेदवारी जाहीर केली आहे.

हेही वाचा - विधानपरिषद निवडणूक : भाजपचा खडसे, पंकजा मुंडे, बावनकुळेंना धक्का, नव्या चेहऱ्यांना संधी

रणजितसिंह मोहिते-पाटील हे राष्ट्रवादी यूवक काँग्रेसचे पहिले प्रदेशाध्यक्ष होते. राष्ट्रवादी यूवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी संपूर्ण राज्यात दौरा करून यूवकांचे संघटन वाढविण्यावर तसेच तरूणांना राष्ट्रवादी सोबत जोडण्यावर भर दिला होता. सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून रणजितसिंह मोहिते-पाटील हे बिनविरोध निवडून आले होते. विधान परिषदेवर त्यांनी 6 वर्षे आमदार म्हणून काम केले. त्यानंतर 2009 ते 2012 असे 3 वर्षे राज्यसभेचे खासदार म्हणून त्यांनी काम केले आहे.

रणजितसिंह मोहिते-पाटील हे 2003 ते 2009 विधान परिषद आमदार होते. 2009 मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामती लोकसभेची जागा ही त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्यासाठी सोडली. तर त्यांनी स्वतः सोलापूर जिल्ह्यातील नव्याने अस्तित्वात आलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. माढा लोकसभा मतदारसंघावर विजयसिंह मोहिते पाटील यांचाच दावा होता. मात्र, मोहिते-पाटील कुटूंबातच वाद निर्माण झाला आणि प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी देखील माढा लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला. मोहिते पाटील यांच्या घरातील वादामुळे शरद पवार यांनी माढ्यातून लोकसभा निवडणूक लढविली. सुप्रिया सुळे यांनी बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढविली. दोघेही मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.

हेही वाचा - करमाड रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख, मुख्यमंत्र्यांची घोषणा

सुप्रिया सुळे या लोकसभेवर निवडूण गेल्यावर त्यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर शरद पवार यांनी रणजितसिंह मोहिते-पाटील यांची नियुक्ती केली. 2009 ते 2012 असे 3 वर्षे रणजितसिंह मोहिते-पाटील हे राज्यसभेचे खासदार होते. मोहिते-पाटील घराणं हे राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातील वजनदार घराणे म्हणून ओळखले जात होते. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून मोहिते-पाटील हे शरद पवारांच्या सोबत होते. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मोहिते-पाटील यांचा हक्काचा असलेला माळशिरस विधानसभा मतदारसंघ राखीव झाला आणि विजयसिंह मोहिते-पाटील यांनी विधानसभेची निवडणूक ही पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून लढविली आणि त्यांचा त्यात पराभव झाला.

या निवडणुकीनंतर विजयसिंह मोहिते पाटील यांना अवघ्या काही महिन्यासाठी विधानपरिषेदवर राष्ट्रवादीकडून संधी देण्यात आली. त्यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत विजयसिंह-मोहिते पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आणि विजयसिंह मोहिते पाटील हे मोठ्या मताने विजयी झाले. त्यानंतर राजकाराणात अनेक घडामोडी घडत गेल्या आणि मोहिते-पाटील कुटूंब हे राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर होत गेले. राष्ट्रवादी आणि मोहिते पाटील यांच्यात वाढत गेलेल्या दूरीमुळेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोहिते-पाटील यांना उमेदवारी न दिल्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला. ज्या मतदारसंघातून खूद्द शरद पवार यांनी निवडणूक जिंकली होती तो राष्ट्रवादी काँग्रेसचा गड असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते-पाटील यांनी भाजपचा उमेदवार विजयी केला. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या 2019 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये देखील माळशिरस या विधानसभा मतदारसंघातून भाजपने दिलेल्या उमेदवाराला निवडूण आणले.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक मतदारसंघात मोहिते-पाटलांची भाजपला मोठी साथ लाभली. त्यामुळेच मोहिते-पाटलांचे पुनर्वसन करण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी देऊ केली आहे, अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी मोहिते-पाटलांचे नाव निश्चित झाल्यानंतर माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील अनेक समर्थकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.