ETV Bharat / state

कर्नाटकातुन जालन्याकडे जाणारा 43 लाखांचा गुटखा सोलापुरात पकडला

author img

By

Published : May 26, 2021, 4:06 PM IST

ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने सांगोला मिरज रस्त्यावर कर्नाटक येथून जालनाकडे निघालेल्या ट्रकची तपासणी केली. त्यामध्ये हिरा पान मसाला, गुटखा आणि सुगंधित तंबाकू याचे पोती होत्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ट्रकसह गुटखा जप्त केला आहे. याची एकूण किंमत 43 लाख 95 हजार इतकी आहे.

Solapur police news
गुटख्यासह दोन आरोपीला पकडल्यानंतर

सोलापूर - ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने सांगोला मिरज रस्त्यावर मोठी कारवाई केली आहे. कर्नाटक येथून जालनाकडे निघालेल्या ट्रकची तपासणी केली असता, त्यामध्ये हिरा पान मसाला, गुटखा आणि सुगंधित तंबाखू याचे पोती होत्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ट्रकसह गुटखा जप्त केला आहे. याची एकूण किंमत 43 लाख 95 हजार इतकी आहे. ट्रकचालकासह पोलिसांनी दोन संशयीत आरोपींना अटक केले आहे आणि सांगोला पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे. जहीर अहमद जमीर शेख (रा. उस्मान पेठ, भोकरदन जालना), रामराव कुंडलिक बावसकर (रा. वरवंडा, भोकरदन, जालना) अशी संशयीत आरोपींची नावे आहेत.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना एका खबऱ्याने माहिती दिली -
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना एका खबऱ्याने माहिती दिली होती. कर्नाटकातून गुटखा येणार आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी त्यांच्या पथकासह सांगोला मिरज रस्त्यावर सापळा लावला होता. मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास (एमएच 21 एक्स 1947) हा ट्रक आला. त्याची तपासणी केली असता त्यामध्ये हिरा गुटखा, रॉयल सुगंधीत तंबाकू असा मुद्देमाल होता. स्थानिक गुन्हे शाखेने सर्व मुद्देमाल व ट्रक जप्त केला आहे.

सापळा लावून कारवाई केली-
सांगोला मिरज रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रात्रभर सापळा लावला होता. सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे वेषांतर करून मुख्य मार्गावर थांबले होते. मंगळवारी सकाळच्या सुमारास मुख्य रस्त्यावर संशयीत ट्रक दिसताच त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई निरीक्षक पाटील, उपनिरीक्षक सिद पाटील, एएसआय शिवाजी घोळवे, हवालदार विजय भोसले, हरिदास पांढरे, रवी गणेश बांगर, सचिन गायकवाड, केशव पवार आदींनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.