ETV Bharat / state

काँग्रेसच्या प्रचार रॅलीत अवतरला राम...सोलापुरात बहुरुपींनी साकारली राम-सीतेची वेशभूषा - हनुमान

सोलापुरातून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे काँग्रेसकडून निवडणूक लढत आहेत. गेल्यावेळी त्यांचा भाजपच्या उमेदवाराकडून पराभव झाला होता. यावेळी त्यांच्यासमोर भाजप उमेदवार जय सिद्धेश्वर आणि अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे आव्हान आहे.

काँग्रेसच्या प्रचार रॅलीत राम, सीता, हनुमानाच्या वेशात बहुरुपी
author img

By

Published : Mar 26, 2019, 12:43 PM IST

Updated : Mar 26, 2019, 3:56 PM IST

सोलापूर - लोकांच्या भावनांना हात घालण्यासाठी राजकीय पक्ष अनेकदा धार्मिक मिथकांचा वापर करतात. धार्मिक मिथके , देवी देवता यांना लोकांच्या मनात विशेष स्थान असल्याने त्याकडे ते आकर्षित होतात. याचेच उदाहरण काँग्रेसच्या सोलापुरातील प्रचार सभेत दिसून आले. बहुरुपी समाजातील कलाकार काँग्रेसच्या रॅलीत राम, सीता आणि हनुमानाचा वेष धारण करुन सामिल झाले होते. या राम सीतेने लोकांचे लक्ष वेधून घेतले.

काँग्रेसच्या प्रचार रॅलीत राम, सीता, हनुमानाच्या वेशात बहुरुपी

बहुरुपी समाज हा आजही मोठ्या प्रामाणात अशिक्षीत आहे. शिक्षणाचा प्रसार न झाल्याने तो पारंपरीक व्यवसायावर अवलंबून आहे. वेगवेगळे वेष धारण करणे हा या कलाकारांचा व्यवसाय आहे. काँग्रेसने आपल्या रॅलीत या कलाकारांना बोलावले. या कलाकारांनी राम, सीता, हनुमान यांची वेशभूषा करुन लोकांचे आकर्षण मिळवले.

Intro:सोलापूर : राम आणि त्याचं मंदिर मुद्दा घेऊन सत्तेपर्यंत मजल मारलेल्या भाजपला कांही अंशी चेकमेट देण्यासाठी सोलापूरात काँग्रेसजणांनी आज एक अनोखी शक्कल लढवली.राम मंदिराच्या मुद्द्याकडे लक्ष्य वेधण्यासाठी त्यांनी चक्क बहुरूपीनां पाचारण केलं.त्यामुळं राम आला काँग्रेसमध्ये अशी चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांत ऐकायला मिळाली.

Body:या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या गर्दीत वंचित घटकातील बहुरूपी समाजाच्या कलावंतांनी केलेली ही वेशभूषा सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. कारण मुद्दा रामाचा आणि त्याच्या भोवती फिरणाऱ्या राजकारणाचा होता.कल्पकतेने भाजपच्या दुखऱ्या नशेवर बोट ठेवण्याचा हा प्रयोग होता.जे या बहुरूपी कलावंतांच्या गावीही नव्हतं.नेमकं हेच जाणून घेतलंय इटीव्ही भारतचे रिपोर्टर यांनी प्रवीण सपकाळ यांनी...

Conclusion:बहुरूपी हा भटका समाज मोठ्या श्रद्धेनं रामायणाची कला सादर करतो.त्याला राजककर्त्यांचं राजकारण कळत नाही.पण चार पैसे मिळवितात म्हणून ते या रॅलीत सहभागी झाले.पण मुद्दा चर्चेचा काँग्रेसजणांच्या आस्थेचा हे मात्र नक्की.
Last Updated : Mar 26, 2019, 3:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.