ETV Bharat / state

सोलापूर जिल्ह्यात 1350 जणांना कोरोनाची लागण, तर 125 जणांचा मृत्यू

सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांची संख्या आता 1 हजार 268 इतकी झाली आहे. तसेच मृतांची संख्या 119 झाली आहे.

solapur covid 19
सोलापूर जिल्ह्यात 1350 जणांना कोरोनाची लागण तर 125 जणांचा मृत्यू
author img

By

Published : Jun 10, 2020, 9:39 AM IST

सोलापूर - सोलापूर शहर व संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ही 1 हजार 350 एवढी झाली असून, आतापर्यंत 125 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकूण 743 जणांवर उपचार केल्यानंतर ते बरे होऊन घरी परतले. सद्यस्थितीत 476 जणांवर उपचार सुरू आहेत. सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांची संख्या आता 1 हजार 268 इतकी झाली आहे. तसेच मृतांची संख्या 119 झाली आहे. आतापर्यंत 710 जण बरे होऊन घरी परतले आहेत तर 439 जणांवर सोलापुरात उपचार सुरू आहेत.

सोलापूर ग्रामीणमध्ये समाधानकारक दिवस -

सोलापूर ग्रामीण क्षेत्रात मंगळवारी एकही कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही. काल 87 जणांचे अहवाल प्राप्त झाले हे सर्व निगेटिव्ह आले आहेत. तसेच मंगळवारी एकही मृत्यू झालेला नाही. ग्रामीण भागात आजवर 82 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 33 जण बरे झाले असून, सध्या 43 जणांवर उपचार सुरू आहेत. सोलापूर ग्रामीणमधील मृतांची संख्या 6 आहे.

80 वर्षांच्या आजीबाईंनी कोरोनाला हरवले -

मंगळवारी बऱ्या झालेल्या 3 महिलांना सिव्हिल हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले. आनंदाची बाब म्हणजे 80 वर्षीय आजीबाईंनी कोरोनावर मात केली आहे. घरी परतताना त्यांनी लोकांना कोरोनाला घाबरू नका. सरकारचे नियम पाळा. सोलापूरच्या रुग्णालयात रुग्णांची उत्तम सोय होत असल्याचा अभिप्रायही दिला आहे.

सोलापूर शहरातील रुग्णांना व्यवस्थित सेवा दिली जावी, यासाठी सहायक संचालक धनराज पांडे यांची तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश काढले आहेत. धनराज पांडे यांनी सोलापूर शहरातील कोविड आणि नॉन-कोविड दवाखाण्यात रुग्णांना उपचार मिळतात का? पॅथॉलॉजिकल लॅब सुरू आहेत का यावर लक्ष ठेवायचे काम देण्यात आले आहेत. तसेच नागरिकांच्या समस्या असतील तर त्या सोडवायच्या आहेत. नागरिकांनी त्यांच्याशी 9049802424 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.