सोलापूर : सोलापुरातील नई जिंदगी परिसरात ऐमन बंदेनवाज बिराजदार ( वय 7 वर्ष,रा प्रभाकर नगर,नई जिंदगी,सोलापूर ) यांचा गुरुवारी 5 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास इलेक्टरीक पोलला शॉक लागून मृत्यू झाला ( 7 year old child died of shock ) होता. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद झाली. 5 जानेवारी रोजी रात्री पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनसाठी दाखल केला होता.
महानगरपालिकेचा निषेध : 6 जानेवारी रोजी शवविच्छेदन झाल्यानंतर, नातेवाईकांना मृतदेह ताब्यात देण्याचा प्रयत्न केला. परंतू नातेवाईकांनी कारवाई झालीच पाहिजे. निष्काळजीपणा करणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांवर किंवा संबंधित ठेकेदारावर कारवाई करा अशी मागणी करत आक्रमक भूमिका घेतली ( family Demand action on municipal employee ) होती. चिमुकलीचा मृत्यू होऊन तब्बल चोवीस तास झाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला. नातेवाईकांनी व प्रहार संघटनेच्या पदाधिकऱ्यानी सोलापूर महानगरपालिकेला श्रद्धांजली देत महानगरपालिकेचा निषेध केला. शुक्रवारी 6 जानेवारी रात्री उशीरा महानगरपालिकेची अधिकारी आले आणि लेखी आश्वासननंतर मृतदेह ताब्यात ( Written assurance of action against offenders ) घेतला.
प्रहार संघटना आक्रमक : गुन्हे दाखल करा मागणी करत दिवसभर ठिय्या मांडला. प्रहार संघटनेचे पदाधिकारी जमीर शेख, खालिद मणियार व इतर कार्यकर्ते हे शवविच्छेदन वार्ड समोर ठिय्या मांडून दिवसभर बसले होते. मृताच्या नातेवाईकांना व वारसांना आर्थिक सहायता मिळाली पाहिजे, अन्यथा सोलापूर महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी केली होती. प्रहार संघटनेचे पदाधिकारी हे मृतदेह मनपा आयुक्त यांच्या कार्यालयात किंवा त्यांच्या निवासस्थानी घेऊन जाणार ( Ayman Birajdar dead body cremated After 24 hours ) होते. सदर बाजार पोलिसांनी वेळीच रोखल्याने अनर्थ टळला. ऐमन बंदेनवाज बिराजदार या मुलीचा मृतदेह शवविच्छेदन खोलीत चोवीस तास पडून होता.
चोवीस तासानंतर मृतदेह ताब्यात घेतला : ऐमन बिराजदार या मुलीच मृतदेह चोवीस तासानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदन खोलीत ऐमनचा मृतदेह पडून होता. 5 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला होता. 6 जानेवारी सायंकाळ झाली तरी प्रहार संघटना व मृत मुलीचे नातेवाईक, आई वडील हे दिवसभर कारवाई व आर्थिक सहायतासाठी बसले होते. जोपर्यंत महानगरपालिका अधिकारी येऊन लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत उठणार नाही अशी भूमिका घेतली होती. अखेर महानगरपालिका अधिकारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आले आणि लेखी आश्वासन दिल्यानंतर ऐमनच्या मृतदेहावर अंतिम संस्कार ( Solapur Municipal Corporation miss management ) झाले.