सोलापूर - पंढरपूर शहरातील चंद्रभागा नदी पात्रातील कुंडलिक मंदिराजवळ दुपारी पाचच्या सुमारास पोहण्यासाठी गेलेले दोघे जण बुडाले होते. त्या दोघांपैकी एका जणाला वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे. नदीपात्रात प्रथमेश कुलकर्णी हा बुडाला आहे. नदी पात्रातील कुंडलिक मंदिराजवळ बुडालेल्या प्रथमेश कुलकर्णीचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा - Maratha Reservation : सोलापुरात मराठा आरक्षणासाठी 4 जुलैला भव्य मोर्चा; नरेंद्र पाटलांची माहिती
एक जणाला वाचवण्यात यश
पंढरपूर शहरातील विठ्ठल मंदिर परिसरातील हरिदास वेस येथे राहणारे चार तरुण पोहण्यासाठी चंद्रभागा नदीपात्रातील कुंडलिक मंदिराजवळ गेले होते. नदीपात्रातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे चारपैकी दोघांनी नदीपात्रात प्रवेश केला नाही. मात्र, नदीपात्राच्या मध्यभागी दोघेजण पोहण्यासाठी गेले असता त्यांना त्या ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते बुडाले. मात्र, शेजारीच असणाऱ्या कोळी समाजातील बांधवांनी त्यातील एका जणाला वाचवले आहे. तर एक जण बुडाला आहे. बुडालेल्या प्रथमेश कुलकर्णीचा शोध पंढरपूर नगरपरिषद प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.
हेही वाचा - पंढरपूर - अपहरण प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल