सोलापूर- वारकरी संप्रदायात सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री या चार वाऱ्यांपैकी एक मुख्य वारी म्हणून कार्तिकी वारी मानली जाते. या वारीला दक्षिणेतील भाविक पंढरीत येतात व रुक्मिणीचे दर्शन घेतात. आतापर्यंत चार लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरीत दाखल झाले आहे.
इतर वाऱ्यांपैकी फक्त याच वारीला दक्षिणेतील भाविक पंढरीत येतात. तर उर्वरित वाऱ्यांना मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र कोकणातला वारकरी येत असतो. दक्षिण भारतातील वारकरी या कार्तिकी एकादशीला पंढरपूरला येऊन विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतात, म्हणून या वारीला विशेष महत्व आहे. या वारीला दक्षिण सीमावर्ती महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील भाविक भक्तांची मोठे गर्दी असते. यावर्षी आतापर्यंत चार लाखांपेक्षा जास्त भाविक भक्त पंढरीत दाखल झाले आहेत. उद्या कार्तिकी एकादशीला कानड्या विठ्ठलाच्या दर्शनानांतर हे सर्व वारकरी परत आपल्या गावी जाणार आहेत.
हेही वाचा- नाट्यप्रेमींकडून सोलापुरात मराठी रंगभूमी दिन साजरा