ETV Bharat / state

तब्बल सतरा वर्षानंतर सोलापूर जिल्हा दूध संघाला मिळाला नवा अध्यक्ष - दिलीप माने लेटेस्ट न्यूज

बुधवारी झालेल्या जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी आमदार संजय शिंदे व दिलीप माने यांच्या नावाची चर्चा होती. आमदार संजय शिंदे यांवर कामाचा व्याप अधिक असल्याने त्यांनी स्वतःहून माघार घेतल्याने दिलीप माने यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. जिल्हा दूध संघावर गेल्या सतरा वर्षांपासून पंढरपूर येथील प्रशांत परिचारक यांची सत्ता होती.

Solapur district milk association got a new president
तब्बल सतरा वर्षानंतर सोलापूर जिल्हा दूध संघाला मिळाला नवा अध्यक्ष
author img

By

Published : Sep 3, 2020, 2:30 AM IST

सोलापूर - सोलापूर जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी माजी आमदार दिलीप माने यांनी बिनविरोध निवड झाली आहे. तब्बल सतरा वर्षानंतर सोलापूर जिल्हा दूध संघाला नवा अध्यक्ष मिळाला आहे. प्रशांत परिचारक हे सतरा वर्ष दूध संघावर अध्यक्षपदी होते.

सोलापूर जिल्हा दूध संघाला मिळाला नवा अध्यक्ष

जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी आमदार संजय शिंदे व दिलीप माने यांच्या नावाची चर्चा होती. आमदार संजय शिंदे यांवर कामाचा व्याप अधिक असल्याने त्यांनी स्वतःहून माघार घेतल्याने दिलीप माने यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. जिल्हा दूध संघावर गेल्या सतरा वर्षांपासून पंढरपूर येथील प्रशांत परिचारक यांची सत्ता होती. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी चर्चा सुरू झाली. परंतु ऐनवेळी संघाचे संचालक औदुंबर वाडदेकर व जयन्त साळे यांनी उच्च न्यायालयात धाव घेत अध्यक्ष निवडीला आवाहन दिले होते. परंतू उच्च न्यायालयाने संचालकांची याचिका बुधवारी सकाळी फेटाळल्याने बुधवारी दुपारी जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी दिलीप माने यांचे नाव निश्चित करण्यात आले.

Solapur district milk association got a new president
दिलीप माने

पाच महिन्यांपूर्वी प्रशांत परिचारक यांनी राजीनामा देत जिल्हा दूध संघाची खुर्ची रिकामी केली होती. जूनमध्ये जिल्हा दूध संघाच्या संचालकांच्या बैठकीत हा राजीनामा नामंजूर करत सभा तहकूब करण्यात आली होती. एकदा दिलेला राजीनामा हा राजीनामा असतो, असा मुद्दा पुढे करत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने अस्थायी अधिकारी म्हणून दुग्ध खात्याचे विभागीय उपनिंबधक सुनील शिरापूरकर यांची नियुक्ती केली होती.

दरम्यान जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदाची हार किंवा माळ कुणाच्या गळ्यात पडणार, असा प्रश्न पक्षश्रेष्ठीं समोर पडला होता. पंढरपूरच्या पक्षश्रेष्ठींनी याबाबत बैठक घेतली. आमदार संजय शिंदे यांनी कामाचा व्याप भरपूर असल्याचे कारण समोर ठेवून माघार घेतली. तर दिलीप माने यांच्या नावाची शिफारस अजित पवारकडे करण्यात आली. बुधवारी दुपारी जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी दिलीप माने यांनी निवड झाली असल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले. या निवडीच्या बैठकीत ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख, आमदार संजय शिंदे, दिलीप सोपल, राजन पाटील, दीपक आबा साळुंखे, मनोहर डोंगरे, राजेंद्रसिंह राजेभोसले, विजय येलपले, मारुती लवटे, बबनराव अवताडे, शिवाजी नागणे, धनश्री गलांडे आदी संचालक मंडळी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.