ETV Bharat / state

उन्हाळी सुट्टीनंतर शाळांमधील किलबिल वाढली.. सोलापूर शहर व जिल्ह्यात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत - जयहिंद फूड बँक

सोलापूर जिल्ह्यात एकूण 2 हजार 805 शाळा आहेत. त्यात जवळपास 20 लाख 9 हजार 510 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी 80 टक्के विद्यार्थ्यांनी आज शाळेत हजेरी लावली. विद्यार्थ्यांना शाळेत येण्याविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांच्यात शिक्षणाची गोडी वाढावी म्हणून, सध्या अनेक शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संघटना निरनिराळे उपक्रम राबवित आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज अक्कलकोट तालुक्यातील कोर्सेगांव येथे बैलगाडी सजवून मुलांना शाळेत आणण्यात आले.

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना टिळा लावून ओवाळताना शिक्षिका
author img

By

Published : Jun 17, 2019, 9:22 PM IST

सोलापूर - नवीन शैक्षणिक वर्षातील आज शाळेचा पहिला दिवस असल्याने सोलापूर शहरात आणि जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. फुगे, चॉकलेट वाटून आणि टिळा लावून तर एवढेच नव्हे पेढे-लाडू वाटून या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. याचवेळी जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि दप्तरांचे वाटप करण्यात आले.

उन्हाळी सुट्टीनंतर शाळांमधील किलबिल वाढली.

सोलापूर जिल्ह्यात एकूण 2 हजार 805 शाळा आहेत. त्यात जवळपास 20 लाख 9 हजार 510 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी 80 टक्के विद्यार्थ्यांनी आज शाळेत हजेरी लावली. विद्यार्थ्यांना शाळेत येण्याविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांच्यात शिक्षणाची गोडी वाढावी म्हणून, सध्या अनेक शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संघटना निरनिराळे उपक्रम राबवित आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज अक्कलकोट तालुक्यातील कोर्सेगांव येथे बैलगाडी सजवून मुलांना शाळेत आणण्यात आले.

सोलापूर शहरातील अनेक शाळांत मुलांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विडी घरकुल या कामगार वस्तीतल्या अरिहंत इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये विद्यार्थ्यांना टिळत लावत चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. कुमठा नाका येथील बालकामगार शाळेत जयहिंद फूड बँकेच्यावतीने शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. त्याचा चिमुरड्यांनी आनंद घेतला.

On the first of school teacher welcoming the students
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना टिळा लावून ओवाळताना शिक्षिका

अशा वेगवेगळ्या उपक्रमांमुळे शाळेच्या पहिल्या दिवशी छान चॉकलेट्स आणि पेढ्याची भेट मिळाल्यामुळे त्यामुळे नव्याने शाळेत येणाऱ्या मुलांमध्ये शाळेविषयी गोडी निर्माण होण्यास मदत होईल. ज्यामुळे बालकामगार आणि अन्य कारणामुळे शाळेत येण्यास नकार देणाऱ्या शाळाबाह्य मुलांची संख्या कमी होणार आहे.

Intro:सोलापूर : आज शाळेचा पहिला दिवस असल्याने सोलापूर शहर - जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं.कुठं फुगे आणि चॉकलेट वाटून, कुठं कुंकूम तिलक करत पेढे-लाडू वाटून तर गरिबांच्या
जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शाळेत शालेय गणवेश आणि दप्तर वाटून विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं.Body:सोलापूर जिल्ह्यात एकूण 2 हजार 805 शाळा असून त्यात जवळपास 20 लाख 9 हजार 510 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.त्यापैकी 80 टक्के विद्यार्थ्यांनी आज शाळेत हजेरी लावली. विद्यार्थ्यांना शाळेत येण्याविषयी आवड निर्माण व्हावी.त्यांच्यात शिक्षणाची गोडी वाढावी म्हणून सध्या अनेक शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संघटना निरनिराळे उपक्रम राबवित आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज अक्कलकोट तालुक्यातील कोर्सेगांव येथे बैलगाडी सजवून मुलांना शाळेत आणण्यात आलं.तर सोलापूर शहरातील अनेक शाळांत मुलांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. विडी घरकुल या कामगार वस्तीतल्या अरिहंत इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये कुंकूम तिलक करत चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आलं.तर कुमठा नाका येथील बालकामगार शाळेत जयहिंद फूड बँकेच्यावतीने शालेय साहित्य आणि खाऊचं वाटप करण्यात आलं.त्याचा चिमरड्यांनी आनंद घेतला.Conclusion:अशा उपक्रमांमुळं पाहिल्याचं दिवशी छान... छान स्वागत चॉकलेट्स आणि पेढ्याची भेट त्यामुळं नव्याने शाळेत येणाऱ्या मुलांमध्ये शाळेविषयी गोडी निर्माण होणार आहे.ज्यामुळं बालकामगार आणि अन्य कारणामुळं शाळेत येण्यास नकार देणाऱ्या शालाबाह्य मुलांची संख्या कमी होणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.