सोलापूर - बार्शी तालुक्यातील भोंणजे येथे एका दूध डेअरीवर कारवाई केली आहे. या कारवाईत 95 हजार 934 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अक्षय दूध डेअरी येथे कारवाई झाली आहे. ही कारवाई अन्न व औषध विभागाचे आयुक्त प्रदीप राऊत व निरीक्षक नसरीन मुजावर यांनी केली आहे.
दुधात भेसळ सुरू असल्याची माहिती मिळाली-
अन्न व औषध विभागास माहिती मिळाली होती, ज्ञानेश्वर दत्तात्रय करळे यांच्या मालकीच्या अक्षय दूध डेअरी येथे दुधात भेसळ सुरू आहे. येथे दुधात व्हे पावडर, गोडेतेल (खाद्यतेल) भेसळ केले जात होते. या माहितीच्या आधारे अन्न व औषध विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईत 95 हजार 934 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दूध डेअरीच्या कारवाईत भेसळ करण्याचा साठादेखील जप्त केला-
अन्न औषध प्रशासनाने अक्षय दूध डेअरी येथे विविध प्रकारचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये दूध 640 लिटर, सूर्यफूल तेल 23.40 किलो, व्हे पावडर 456, असा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई आयुक्त प्रदीप राऊत, नसरीन मुजावर या अधिकऱ्यांनी केली.