सोलापूर: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील Accident of private comfort bus Solapur लिंबीचिंचोळी (ता.द.सोलापूर) गावाच्या परिसरात सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कर्नाटक राज्यातील खासगी बस उलटून झालेल्या अपघातात bus accident on Solapur Akkalkot Highway एक ठार तर सहा प्रवासी जखमी one died six injured Solapur Bus Accident झाल्याची प्राथमिक माहिती वळसंग पोलिसांनी Walsang Police Station दिली आहे. जखमींना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मोहम्मद नासिर अहमद (वय 53 वर्षे, रा. गुलबर्गा, कर्नाटक) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याचे शव सोलापुरातील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.
स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते- अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन कर्नाटकातील भाविक पहाटेच्या सुमारास सोलापूरकडे येत होते. वळसंग गावाहून लिंबीचिंचोळी हद्दीत गाडी येत असताना पुलावरील डिव्हायडरवर चढल्याने हा अपघात झाला. डीवायडर बस चढल्याने चालकाचा ताबा सुटला आणि हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर वळसंग पोलिस ठाण्याकडील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. बसमधील जखमींना उपचारासाठी शासकीय रूग्णालया दाखल केले. या अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काही वेळ खोळंबली होती अशी माहिती पोलिसांनी दिली.
अपघातात सहा जण जखमी - सोलापूर अक्कलकोट महामार्गावर खाजगी आराम बसचा अपघात झाला असून त्यामध्ये सहा जण जखमी झाले आहेत. निगम्मा पुजारी (वय 54,रा रायचूर,कर्नाटक), रुकय्या बेगम शुकुर शेख (वय 77,रा.मुंबई),अमरीश कोंडी (वय 33,रा चिंचोळी,गुलबर्गा), सतीश कुमार (वय 37,रा यादगिर,कर्नाटक), अप्पाराव काळे (वय वय 65 ,रा आळंद,जि गुलबर्गा,कर्नाटक), अनिल राठोड (वय वय 22,रा,शहापूर,यादगिर,कर्नाटक) असे जखमी झालेल्या प्रवाशाची नावे आहेत. त्यांना शासकीय सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.