ETV Bharat / state

ACB arrests investigating officer : फटाका फॅक्टरी स्फोट प्रकरणात अधिकाऱ्याचा धमाका; तीस हजारांची लाच घेताना अटक

बार्शीमधील पांगरी गावाजवळील शिराळे गावात फटाके कंपनीत मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात चार महिला कामगारांचा मृत्यू झाला होता. फटाका फॅक्टरी स्फोटाचा तपास सुरू असताना, पांगरी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने मोठा धमाका केला आहे. एसीबीने 15 हजार रुपयांची लाच घेताना अधिकाऱ्यास पकडले.

ACB arrests investigating officer
फॅक्टरी स्फोटातील तपासी अधिकाऱ्याचा धमाका
author img

By

Published : Jan 12, 2023, 9:21 AM IST

Updated : Jan 12, 2023, 4:50 PM IST

सोलापूर : पांगरी पोलीस ठाण्यात तीस हजारांची लाच घेताना अटक केले. दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याचा तपास सुरू असताना पांगरी पोलीस ठाण्याच्या आवारात सोलापूर एसीबीने 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पांगरी पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस अधिकाऱ्यास अटक केली आहे. त्याचबरोबर पांगरी पोलीस ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी व बाहेर बाजूस असलेल्या एका कँटीन चालकास अटक केली आहे. एसीबीच्या कारवाईमुळे सोलापूर ग्रामीण पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

लाच स्वीकारण्याची कँटीनचालकाचा वापर : पांगरी पोलीस ठाण्यात लाच स्वीकारण्याची नवी शक्कल समोर आली आहे. पोलीस ठाण्यात जाऊन तडजोड करून लाच देण्याची रक्कम ठरवली जात होती. पीडित किंवा तक्रादार व्यक्तीना बाहेरील कँटीनमध्ये लाचेची रक्कम द्यावी लागत होती. अँटी करप्शन सोलापूर विभागाने पोलिसांचा हा डाव हाणून पाडला आहे. पांगरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे व कॉन्स्टेबल सुनील बोदमवाड, कँटीन चालक हसन इस्माईल सय्यद या तिघांवर एसीबीने 15 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचा गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे.

एसीबी सोलापूर कार्यालयकडे तक्रार प्राप्त झाली होती : तक्रारदार व त्यांच्या भावाविरुध्द पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. सदर दाखल गुन्हयात तक्रारदार व त्यांचा भाऊ या दोघांचा न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजुर केला होता. सदर गुन्हयात तक्रारदार तसेच त्याच्या भावाला नॉमीनल अटक करुन जामीनावर सोडण्याकरीता गुन्हयाचे तपास अधिकारी एपीआय नागनाथ खुणे व त्यांचे दप्तरी कॉन्स्टेबल सुनील बोदमवाड यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रत्येकी 15 हजार रुपये प्रमाणे एकूण 30 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. लाच रक्कम पोलीस स्टेशन बाहेरील कँटीन चालक हसन सय्यद यांकडे देण्यास सांगितले होते.

एसीबीच्या कचाट्यात अडकले : कँटीन चालकाने बुधवारी 11 जानेवारी रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सदर लाच रक्कम स्वीकारली. सापळा लावलेल्या एसीबीच्या टीमने ताबडतोब कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले व त्याच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पांगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या फटाका फॅक्टरी स्फोट प्रकरणात दोन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये युसूफ मणियार हा पोलिसांच्या ताब्यात आहे, तर मुख्य संशयीत आरोपी नाना पाटेकर हा अद्यापही फरार आहे. याचा तपास सुरू असताना पांगरी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे हे एसीबीच्या कचाट्यात अडकले आहेत.

हेही वाचा : Solapur Crime : बार्शीतील फटाका फॅक्टरी स्फोटातील मुख्य आरोपीस अटक

मुख्य संशयीत अजूनही फरार : नाना पाटेकरला अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक देखील वेगवेगळ्या शहरात शोध घेत आहेत. फटाका फॅक्टरी स्फोटाची जखम ताजी असताना पांगरी पोलीस ठाण्यात एसीबीने कारवाई करत मोठा धमाका केला आहे. सदरची कारवाई एसीबीचे उपअधीक्षक गणेश कुंभार, निरीक्षक उमाकात महाडिक, शिरीषकुमार सोनवणे, प्रमोद पकाले, श्रीराम घुगे, सलीम मुल्ला, गजानन किणगी, उडानशिव, शाम सुरवसे एसीबी सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Last Updated : Jan 12, 2023, 4:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.