ETV Bharat / state

सकारात्मक : नव्वद वर्षांचे आजोबा, एका वर्षाच्या बाळाची कोरोनावर मात

author img

By

Published : May 9, 2020, 9:41 PM IST

छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील कोरोना विलगीकरण कक्षातून आतापर्यंत 29 रुग्णांना कोरोनामुक्त करून घरी पाठविण्यात आले आहे. यामध्ये नव्वद वर्षांचे गृहस्थही होते तर एका वर्षाचे बाळही होते, अशी माहिती औषध वैद्यकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख तसेच कोरोना कक्षप्रमुख डॉ. एच.व्ही. प्रसाद यांनी दिली.

सकारात्मक : नव्वद वर्षांचे आजोबा, एका वर्षाच्या बाळाची कोरोनावर मात
सकारात्मक : नव्वद वर्षांचे आजोबा, एका वर्षाच्या बाळाची कोरोनावर मात

सोलापूर - शहरातील नव्वद वर्षांचे आजोबा आणि एका वर्षाचे बाळ कोरोनामुक्त झाले आहेत. शासकीय रुग्णालयात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यात येत होते. उपचारानंतर 90 वर्षांच्या आजोबांनी आणि एका वर्षाच्या बाळाने कोरोनावर मात केली असल्याची माहिती डॉ. एच.व्ही.प्रसाद यांनी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील कोरोना विलगीकरण कक्षातून आतापर्यंत 29 रुग्णांना कोरोनामुक्त करून घरी पाठविण्यात आले आहे. यामध्ये नव्वद वर्षांचे गृहस्थही होते तर एका वर्षाचे बाळही होते, अशी माहिती औषध वैद्यकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख तसेच कोरोना कक्षप्रमुख डॉ. एच.व्ही. प्रसाद यांनी दिली.

कोरोना विलगीकरण कक्षात शंभरपेक्षाही जास्त रुग्ण भरती झाले होते. त्यातील 29 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. या 29 जणांत एक रुग्ण तब्बल 90 वर्षाचे होते तर एक रुग्ण केवळ एक वर्षाचे बाळ होते. मेडिकल कॉलेजच्या पथकाने त्यांच्यावर उपचार करुन त्यांना कोरोनामुक्त केले आहे. एका रुग्णास न्युमोनिया होता, तसेच मुत्रपिंडाचा आजारही होता. त्यांच्यावर कोव्हिड आयसीयूमध्येच डायालिसिस करण्यात आले. त्यांचा न्यूमोनियाही बरा झाला.
उर्वरित 26 रुग्णांपैकी सात लोकांना न्युमोनिया होता. पाच लोकांना घसा दुखीचा त्रास होता. उर्वरित 14 लोकांना कोरोना बाधा झाल्याची कोणतीही लक्षणे नव्हती. मात्र यांना रक्तदाब, दमा, मधुमेह आणि ह्दयविकार आदी त्रास होते. मात्र, त्यांच्यावर उपचार करून त्यांना कोरोनामुक्त करण्यात आले, अशी माहिती डॉ. प्रसाद यांनी दिली.

विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेल्या 26 रुग्णांना न्यूमोनिया, 28 रुग्णांना घसादुखीचा त्रास होता म्हणून खोकला, ताप अथवा दम लागल्यास रुग्णालयात तत्काळ येणे गरजेचे आहे. मृत झालेल्या रुग्णांपैकी बहुतांश 55 वर्षांपेक्षा जास्त आहेत म्हणून ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे गरजेचे आहे, असे डॉ. प्रसाद यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.