ETV Bharat / state

सोलापुरात कोरोनाचे 52 बळी, आतापर्यंत 590 जणांना कोरोनाची लागण - coronavirus Solapur live update

सोलापूरात कोरोनामुळे 52 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासात 6 जणांचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला असल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. तर एकून 590 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

सोलापूर
सोलापूर
author img

By

Published : May 25, 2020, 12:42 PM IST

सोलापूर - शहरात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. मागील 24 तासात 6 जणांचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला असून आतापर्यंत कोरोनामुळे 52 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 590 जणांना कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत 254 जण कोरोनामधून बरे झाले आहेत.

सोलापुरात आतापर्यंत एकूण 5 हजार 645 जणांची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 5 हजार 55 जणांचे अहवाल हे निगेटीव्ह आले असून 590 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. ज्या भागात नव्याने कोरोना रुग्ण आढळले आहेत. तो भाग सील करण्यात आला आहे.

सोलापुरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले असल्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणतीही दुकान सुरू करण्याला परवानगी देण्यात आलेली नाही. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र सर्व दुकानांना परवानगी देण्यात आली असून कडक नियमावली घालून दिली आहे.

नियमाचा भंग करणाऱ्या विरूद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात व्यवहार सुरुळीत सूरू होत असताना कोरोनाच्या अनुषंगाने जे नियम घालून दिले आहेत त्याचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.