सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आयपीएल सामान्यावर सट्टा घेणाऱ्या सट्टेबाजावर छापा टाकून साहित्य जप्त केले आहे. शहरातील दोन व्यक्ती मुळेगाव तांडा येथे आयपीएल सामान्यावर सट्टा लावत असल्याची गुप्त माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना कारवाईचे आदेश दिले. या आदेशानुसार पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पाटील यांंचे पथक कारवाईसाठी पाठविले.
हे साहित्य जप्त -
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुळेगाव तांडा येथील एलकेपी सोसायटी येथील एका घरावर छापा टाकला. घटनास्थळी आयपीएल सट्टा अड्ड्यावर छापा टाकून ११ मोबाईल, 1 टीव्ही, 1 लॅपटॉप, चार्जर , वही, दोन बॉलपेन असा मुद्देमाल जप्त केला.
आयपीएल सट्टाबाजार मार्फत जुगार अड्डा सुरू -
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुळेगाव येथील एका सोसायटीत कारवाई केली. या कारवाईत एकूण पाच संशयीत आरोपींना अटक केली. यामध्ये गोपाळ सुभाष राठोड (वय 34, रा. एल के पी सोसायटी, मुळेगाव, सोलापूर), गुरुनाथ अन्नप्पा अचलारे (वय 39, रा. हतुरे वस्ती, सोलापूर शहर), सागर भारत हेडगिरे (वय 30. रा. एकता नगर, सोलापूर), सम्राट माने (रा गुलमोहर अपार्टमेंट, सोलापूर) आणि गोटू रोडगे (मेकॅनिक चौक, सोलापूर) यांना अटक केली आहे.
सोलापूर शहरातील दोन व्यक्ती चालवत होते सट्टाबाजार -
घटनास्थळी संशयीत व्यक्तीची चौकशी केली. यातून ते शहरात सट्टा चालवत असल्याची माहिती मिळाली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी या संदर्भात तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून या व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
आयपीएल सट्टाबाजारवर कारवाई करताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अ. पाटील व यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार निलकंठ जाधवर, हवलदार बिराजी पारेकर, श्रीकांत गायकवाड, सचिन वाकडे, सलीम बागवान, परशुराम शिंदे, लाला राठोड, अजय वाघमारे, महिला कॉन्स्टेबल सरस्वती सुंगधी यांनी कमगिरी केली आहे.