सोलापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात संचारबंदी सुरू आहे. संचारबंदीमुळे भटक्या, स्थलांतरित व बेरोजगार लोकांचे मोठे हाल होत असून त्यांच्या जेवणाचीही मोठी अडचण होत आहे. त्यांना मदत करण्यासाठी लोकसहभागातून जमा झालेल्या अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तुंचे वाटप अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभार शिंदे यांच्या हस्ते मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आले.
-
मा.अपर पोलिस अधीक्षक श्री अतुल झेंडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मा.प्रभाकर शिंदे,सोलापूर उपविभाग यांचे हस्ते #मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीतील भटक्या, स्थलांतरित व रोजगार उपलब्ध नसलेल्या 100 कुटुंबांना लोकसहभागातून जमा झालेले 2500 किलो अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले pic.twitter.com/GijU7hBR8T
— SOLAPUR RURAL POLICE (@SpSolapurRural) April 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">मा.अपर पोलिस अधीक्षक श्री अतुल झेंडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मा.प्रभाकर शिंदे,सोलापूर उपविभाग यांचे हस्ते #मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीतील भटक्या, स्थलांतरित व रोजगार उपलब्ध नसलेल्या 100 कुटुंबांना लोकसहभागातून जमा झालेले 2500 किलो अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले pic.twitter.com/GijU7hBR8T
— SOLAPUR RURAL POLICE (@SpSolapurRural) April 3, 2020मा.अपर पोलिस अधीक्षक श्री अतुल झेंडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मा.प्रभाकर शिंदे,सोलापूर उपविभाग यांचे हस्ते #मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीतील भटक्या, स्थलांतरित व रोजगार उपलब्ध नसलेल्या 100 कुटुंबांना लोकसहभागातून जमा झालेले 2500 किलो अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले pic.twitter.com/GijU7hBR8T
— SOLAPUR RURAL POLICE (@SpSolapurRural) April 3, 2020
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीत अडकलेल्या गरीब, रोजंदारी मजुर, स्थलांतरितांचे मोठे हाल होत होते. त्यांना दोन वेळचे जेवण मिळणेही मुश्किल झाले होते. यामुळे अशा लोकांच्या मदतीसाठी आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर लोकांनी सढळ हाताने मदत करत अन्नधान्य व जीवनाश्यक वस्तू दिले. यावेळी तब्बल 2500 किलो अन्नधान्य व जीवनाश्यक वस्तु जमा झाले. जमा झालेल्या मदतीचे वाटप मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीतील गरजुंना शनिवारी (दि. 4 एप्रिल) करण्यात आले, अशी माहिती सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून देण्यात आली आहे.
हेही वाचा - पोलिसाच्या मुलीने दिला वाढदिनी सर्वांना 'हा' संदेश