ETV Bharat / state

सोलापुरात दिलासादायक बाब; ग्रामीण भागात मात्र चिंता कायम - सोलापूर कोरोना न्यूज

शहरातील रुग्णसंख्या कमी होत आहे. रविवारी 30 मे रोजी शहरात 14 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे एकाच दिवशी 77 जण बरे झाले.

सोलापूर कोरोना न्यूज
सोलापूर कोरोना न्यूज
author img

By

Published : May 30, 2021, 9:59 PM IST

सोलापूर - शहर परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सोलापूर शहर आणि जिल्ह्यात हाहाकार माजला होता. मार्च ते एप्रिल या दोन महिन्यात सोलापुरातील रुग्णालयात उपचारासाठी बेड मिळवणं मोठं परिश्रम करावे लागत होते. मात्र आता शहरात कोणत्याही हॉस्पिटलमध्ये सहजरीत्या बेड उपलब्ध होत आहेत. शहरातील रुग्णसंख्या कमी होत आहे. रविवारी 30 मे रोजी शहरात 14 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे एकाच दिवशी 77 जण बरे झाले. परंतु शहरातील 2 रुग्णांचा बळी या महामारीने घेतला आहे. ग्रामीण भागात मात्र चिंता कायम आहे. ग्रामीण भागात रविवारी एकाच दिवशी 730 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 21 जणांचा मृत्यू कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे झाला आहे.

सोलापूर शहर अहवाल -
सोलापूर शहरात आज रविवारी दि.30 मे रोजी कोरोनाचे नवे 14 रुग्ण आढळले असून यामध्ये 7 पुरुष तर 7 स्त्रियांचा समावेश आहे. सोलापूर शहर आरोग्य प्रशासनाकडे एकूण 1652 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यामध्ये 1221 निगेटिव्ह तर 14 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दिलासादायक बाब म्हणजे रविवारी शहरात 77 रुग्णांनी कोरोना आजारावर मात केली आहे. हे रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली. कोरोनामुळे रविवारी शहरात 2 रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सोलापूर ग्रामीण कोरोना अहवाल-
सोलापूर जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या 30 मेच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीण भागामध्ये तब्बल 730 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. रविवारी एकूण 8748 कोरोना अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी 8018 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ग्रामीण भागात बरे होण्याचे प्रमाण हे बाधित व्यक्तींपेक्षा जास्त आहे. रविवारी 30 मे रोजी ग्रामीण भागातील 730 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये पुरुष 396 तर 334 महिलांचा समावेश आहे. रविवारी एकाच दिवसात बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 1798 आहे. यामध्ये 1059 पुरुष तर 739 महिलांचा समावेश होतो. ग्रामीण भागात 21 रुग्णांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.