ETV Bharat / state

पतीसोबत भांडण झाल्याच्या रागात आंबोली दरीत उडी मारून पत्नीने केला आत्महत्येचा प्रयत्न - पतीसोबत भांडण बातमी

पतीसोबत भांडण करून रागाच्या भरात आंबोली दरीत उडी मारून एका नवविवाहितेने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. बचाव पथकाने तिला वचावले असून तिला जखमी अवस्थेत सावंतवाडी उपजिल्हा रग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

सदरचा फोटो रेळेकर सरांना विचारूनच लावला आहे
छायाचित्र
author img

By

Published : Jun 16, 2021, 3:06 PM IST

Updated : Jun 16, 2021, 3:37 PM IST

सिंधुदुर्ग - पतीच्या रागातून आंबोली दरीत उडी टाकून एका नवविवाहित महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. कमल रामनाथ इंडे (वय 25 वर्षे), असे तीचे नाव आहे. मूळ अहमदनगर येथील ही नवविवाहित आपल्या पतीसोबत सध्या वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा येथे राहते. आंबोली बचाव पथकातील सदस्यांनी दरीत उतरून या महिलेला सुखरूप बाहेर काढले आहे.

घटनास्थळ

सावंतवाडीतून एसटीने आंबोली येथे गेली होती महिला

कमल रामनाथ इंडे ही महिला सावंतवाडीतून एसटीने आंबोली येथे गेली होती. तिथून एका रिक्षाने ती आंबोली धबधब्याकडे आली होती. तेथूनच काही अंतरावर चपला व ओढणी बाजूला ठेवून तिने दरीत अचानक उडी घेतली. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी बचाव पथकाच्या सहायाने तिला सुखरूप बाहेर काढले. दरम्यान, सकाळी पतीसोबत भांडण झाले होते. त्यामुळे रागाने गावाकडे जाण्यासाठी एसटीने घराबाहेर पडले. मात्र, आंबोलीत गेल्यानंतर आपल्या मनात आत्महत्येचा विचार आला आणि हा प्रकार आपण केला, असे तिने पोलिसांना सांगितले.

पतीच्या रागातून घेतला टोकाचा निर्णय

पती बरोबर झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून आपण हा टोकाचा निर्णय घेतला, अशी कबूली तीने पोलिसांना दिली आहे. दरम्यान, दरीत पडल्यामुळे तिच्या अंगावर जखमा झाल्या आहेत. तसेच एक पाय फॅक्चर आहे. त्यामुळे उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रग्णालयात तिला पाठविण्यात आल्याचे पोलीस निरिक्षक सचिन हुंदलेकर यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेबाबत सावंतवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा - सिंधुदुर्ग दौरा अर्धवट सोडून नारायण राणे तातडीने दिल्लीकडे रवाना

Last Updated : Jun 16, 2021, 3:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.