ETV Bharat / state

सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर कायम; नागरिकांच्या घरात घुसले पाणी

author img

By

Published : Jul 8, 2020, 8:37 PM IST

Updated : Jul 8, 2020, 10:53 PM IST

सतत पडणाऱ्या पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला अक्षरक्ष झोडपून काढले आहे. जिल्ह्याची राजधानी असलेल्या ओरोस येथील जैतापकर कॉलनीतील अनेक नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने तारांबळ उडाली आहे.

sindhudurg
नागरिकांच्या घरात घुसलेले पाणी

सिंधुदुर्ग - गेले दोन दिवस सतत पडणाऱ्या पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. जिल्ह्याची राजधानी असलेल्या ओरोस येथील जैतापकर कॉलनीतील अनेक नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने तारांबळ उडाली आहे. पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने विहिरीच्या काठापर्यंत पाणी पोहोचल्याने पाणी गढूळ झाले आहे. मालवण नांदरुख मार्गावर पाणी आल्याने वाहतूक बंद आहे, तर वाडा-देवगडही पूरजन्य परिस्थिती आहे.

सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर कायम; नागरिकांच्या घरात घुसले पाणी

कांदळगाव मसुरे रस्त्यावरही पाणी आल्याने वाहतूक बंद आहे. देवबाग संगम किनाऱ्याला दरवर्षी पावसाळ्यात समुद्री उधाणाचा फटका बसत असून किनाऱ्यालगतचे वाळूचे बेट दिसेनासे झाले आहे. तर लगतची शवदाहिनी समुद्राच्या उधाणात वाहून गेली आहे. शिरोडा वेळागर येथील समुद्र किनाऱ्याचीही धूप होत असून किनाऱ्यावरील सुरुची झाडे व स्ट्रीट लाइट उन्मळून पडले आहेत.

दोडमार्गमधील तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने तिलारी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 8, 9, 10, 11 जुलैदरम्यान जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तसेच समुद्रात उंचच उंच लाटा उसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Last Updated : Jul 8, 2020, 10:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.