ETV Bharat / state

रॉक गार्डन परिसरात समुद्राच्या फेसाळ पाण्याची पसरली 'मखमली' चादर - sindhudurg rain update news

खडकात जोरदार लाटा धडकत असल्याने निर्माण झालेल्या फेसाळ पाण्याने जणू बर्फ पडावा अथवा कापूस पिंजावा अशी मखमली चादर किनाऱ्यावर पसरली आहे. कोरोना काळ असल्याने निर्बंधांमुळे पर्यटक नाहीत. अन्यथा फेसाळ पाण्याचा अनोखा नजरा पाहण्यासाठी निश्चितच मोठी गर्दी उसळली असती हे नक्की.

velvet sheet of sea water spreads in the Rock Garden area in sindhudurg
रॉक गार्डन परिसरात समुद्राच्या फेसाळ पाण्याची पसरली 'मखमली' चादर
author img

By

Published : Jun 17, 2021, 10:13 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील मालवण समुद्र किनारी सध्या अनोखा नजर पहायला मिळत आहे. येथील रॉक गार्डन परिसरात सध्या बर्फ पडल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. समुद्राच्या लाटांचा फेस सर्वांचा लक्ष वेधून घेत आहे. हा फेस या भागात पसरला असून जणू काही बर्फ पडला असल्याचा भास होत आहे.

रॉक गार्डन परिसरात समुद्राच्या फेसाळ पाण्याची पसरली 'मखमली' चादर

'हा' नजारा अनेकांचा लक्ष वेधून घेत आहे

सक्रिय झालेल्या मान्सूनमुळे कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे समुद्र खवळून निघाला आहे. जोरदार लाटा किनारपट्टीवर धडकत आहेत. मालवण रॉक गार्डन येथील किनारपट्टी भागात पोलीस वसाहतीच्या मागे निसर्गाचा अनोखा नजरा दिसून येत आहे. हा नजारा अनेकांचा लक्ष वेधून घेत आहे.

कापूस पिंजावा अशी मखमली चादर पसरली किनाऱ्यावर

खडकात जोरदार लाटा धडकत असल्याने निर्माण झालेल्या फेसाळ पाण्याने जणू बर्फ पडावा अथवा कापूस पिंजावा अशी मखमली चादर किनाऱ्यावर पसरली आहे. कोरोना काळ असल्याने निर्बंधांमुळे पर्यटक नाहीत. अन्यथा फेसाळ पाण्याचा अनोखा नजरा पाहण्यासाठी निश्चितच मोठी गर्दी उसळली असती हे नक्की. मात्र मालवणकर या अनोख्या निसर्ग चमत्काराचा अनुभव घेत आहेत.

बर्फाळ प्रदेशातील दृष्य मालवण किनारपट्टीवर

मालवणमध्ये पावसाने गुरुवारी काहीशी विश्रांती घेतल्याने पाण्याच्या लाटांचा तयार होणारा फेस मुक्तपणे वाऱ्याने उडून आजूबाजूला पसरत असून हा नजरा अनेकांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. एकूणच बर्फाळ प्रदेशातील दृष्य मालवण किनारपट्टीवर दिसून येत आहे. खरंतर बर्फ पडणे सोडून कोकणात बाकी सर्व हंगामातील वातावरणाचा पुरेपूर आनंद घेता येतो. बर्फ न पडणे एवढीच या भागातील कमी आहे. त्यामुळे खरा बर्फ जरी पडत नसला तरी निसर्गाच्या या चमत्काराने सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

हेही वाचा - उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी हिंदू-मुस्लिम दंगे भडकवले जातील - अ‌ॅड. प्रकाश आंबेडकर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.