ETV Bharat / state

जाळ्यामध्ये अडकलेल्या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाला जीवदान - जाळ्यात अडकलेल्या कासवाला जीवदान न्यूज

वेंगुर्ल्यात ऑलिव्ह रिडले जातीचा कासव जाळ्यात अडकलेल्या स्थितीत वेंगुर्ला वायंगणी किनाऱ्यावर आढळला. तेव्हा त्याला कासव मित्र सुहास तोरसकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जाळ्यातून सुखरूप काढले आणि त्या कासवाला वायंगणी समुद्रात नैसर्गिक अधिवासात सोडले आहे.

turtle saviours save the turtle stuck in the net at Vengurla
जाळ्यामध्ये अडकलेल्या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाला युवकांनी दिले जीवदान
author img

By

Published : Jun 14, 2020, 9:10 AM IST

सिंधुदुर्ग - कोकण किनाऱ्यावर मासेमारीच्या तुटलेल्या जाळ्यात अनेक जलचर अडकलेल्या स्थितीत सापडत आहेत. असाच एक ऑलिव्ह रिडले जातीचे कासव जाळ्यात अडकलेल्या स्थितीत वेंगुर्ला वायंगणी किनाऱ्यावर आढळून आले. तेव्हा त्याला कासव मित्र सुहास तोरसकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जाळ्यातून सुखरूप काढले आणि त्या कासवाला वायंगणी समुद्रात नैसर्गिक अधिवासात सोडले आहे.

खोल समुद्रात मासेमारी करताना, बऱ्याचवेळा मच्छीमारांची मासेमारीची जाळी समुद्रात तुटून जातात. सध्या पावसाळी वातावरणामुळे समुद्राला उधाण आले आहे. यामुळे समुद्रातील घाण लाटांसोबत या जाळ्याही किनाऱ्यावर येत आहे. या जाळ्यात अनेक जलचर अडकलेले असतात. अशाच एका जाळ्यात ऑलिव्ह रिडले जातीचे कासव अडकले होते.

जाळ्यामध्ये अडकलेल्या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाला युवकांनी दिले जीवदान...

तेव्हा कासव मित्र सुहास तोरसकर व त्यांचे सहकारी बालकृष्ण खोबरेकर, किशोर तारी, सुधीर नार्वेकर, कुणाल खोबरेकर, गितेश खोबरेकर, जयेश तोरस्कर आणि सेजल खोबरेकर यांनी त्या कासवाची जाळ्यातून सुटका केली. व त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. दरम्यान, सुहास तोरसकर यांनी अशा जाळ्यामध्ये अडकलेल्या अनेक कासवांना जीवदान दिले आहे.

हेही वाचा - #PesticidesBan : सिंधुदुर्गतील काजू उत्पादकांमध्ये कीटकनाशकांबाबत संमिश्र प्रतिक्रिया

हेही वाचा - सिंधुदुर्ग : केरनंतर टस्कर हत्तीचा मोर्चा आता मोर्ले गावाकडे; नागरिकांमध्ये दहशत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.