ETV Bharat / state

कणकवलीत अजूनही कातकरी आदिवसी वेशीबाहेर, नागरी सुविधांचा अभाव - कोरोना विषाणू

या लोकांना पाण्यासाठी नदीवर अवलंबून राहावे लागते. दरवर्षी गणेश विसर्जनाच्या कमानी आणि इतर सोईंसाठी साधारणतः 3 लाखांचा खर्च होतो. परंतु, आजवर राष्ट्रवादी आणि आता भाजप पक्षाची सत्ता कणकवली नगरपंचायतीत आहे. यापैकी एकानेही शौचालयाच्या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही.

Kankavali
कणकवलीत अजूनही कातकरी आदिवसी वेशीबाहेर
author img

By

Published : Apr 30, 2020, 3:15 PM IST

सिंधुदुर्ग - कणकवली शहरालगत जाणवली नदी काठावर आदिवासी कातकरी बांधवांची वस्ती आहे. 7 कुटुंब या ठिकाणी राहतात. गेल्या 5 दशकाहून अधिक काळ या ठिकाणी वास्तव्य असल्याचे हे लोक सांगतात. विशेष म्हणजे कणकवली शहरालगत असलेल्या गणपतीसान या ठिकाणी ही वस्ती असताना अजूनही येथे ना पिण्याचे पाणी, ना रहायला चांगला निवारा, ना शौचालय किंवा ना नागरी सुविधा आहेत. त्यामुळे शहरात असूनही या लोकांना पुन्हा जंगलात ढकलण्याचे काम केले जात आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

अजूनही कातकरी आदिवसी वेशीबाहेर

कणकवली हे तसे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती शहर. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे निवास्थान हे कणकवलीतच आहे. किंबहुना त्यांच्यामुळेच हे शहर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेच्या केंद्र्स्थानी आले, ही झाली कणकवलीची राजकीय ओळख. कणकवली हे शहर जाणवली आणि गड नदी या दोन नद्यांच्या मध्ये वसली आहे, ही झाली भौगोलिक ओळख आणि कणकवली ही भंगी मुक्तीचा आदर्श ज्यांनी घातला त्या अप्पासाहेब पटवर्धनांची कर्म भूमी, भालचंद्र महाराजांची पुण्य भूमी व हागणदारी मुक्त असलेले गाव, ही झाली सामाजिक ओळख. परंतु, याच कणकवलीत जाणवली नदीवरील ज्या गणपती साण्याचे शुशोभीकरण करण्यासाठी कणकवली नगरपंचायतीने सुमारे 50 लाखाचा निधी खर्च केला आणि हे ठिकाण अत्याधुनिक दिव्यांच्या प्रकाशात झळाळून टाकले. त्याच ठिकाणाला लागून असलेल्या आदिवासी कातकरी बांधवांच्या वस्तीत अजून साधा पथ दीपही पेटलेला नाही.

या लोकांना पाण्यासाठी नदीवर अवलंबून राहावे लागते. दरवर्षी गणेश विसर्जनाच्या कमानी आणि इतर सोईंसाठी साधारणतः 3 लाखांचा खर्च होतो. परंतु, आजवर राष्ट्रवादी आणि आता भाजप पक्षाची सत्ता कणकवली नगरपंचायतीत आहे. यापैकी एकानेही शौचालयाच्या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही, अशी माहिती येथील आदिवासी बांधवानी दिली आहे.

2008 साली कणकवलीत आदिवासी कातकरी बांधवांचे अधिवेशन भरले होते. या अधिवेशनात येथील प्रश्नांना वाचा फुटली. जिल्ह्यातील आणि बाहेरील अशा 2 हजार लोकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. यानंतर कणकवलीतील आदिवासी बांधवानी कणकवली नगरपंचायतीवर टमरेल मोर्चाही काढला. त्यावेळी जी आश्वासन दिली गेली ती सोईसकर पणे विसरली गेली. 2010 मध्ये नदीला आलेल्या पुराने येथील वस्तीला उद्ध्वस्त केले. कसेबसे लोक वाचले, त्यांच्या शेळ्या मेंड्या वाचल्या. मात्र, जीवनावश्यक वस्तू आणि भांडी-कुंडी असं सार काही वाहून गेले. पूर ओसरेपर्यंत येथील मंदिराच्या आश्रयाला ही कुटुंबे जाऊन राहिली. ही सारी व्यथा येथील विशेषतः महिला सांगत होत्या.

शौचालय नसल्यामुळे आम्हाला उघड्यावर जावे लागते, असे येथील वृद्ध महिला शेवंती गोपाळ निकम यांनी सांगितले. या कातकरी समाजाचे प्रश्न घेऊन गेली अनेक वर्षे कणकवलीतील अखंड लोकमंच ही संस्था विविध पातळ्यांवर आवाज उठवत आहे. तर आदिवासींचे प्रश्न समजून त्यांना प्रवाहासोबत नेण्याची गरज आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते मोडक यांनी मांडले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.