ETV Bharat / state

सिंधुदुर्गाची कोरोना मुक्तीकडे वाटचाल; आणखी 13 जण कोरोनामुक्त, सक्रिय रुग्णांची संख्या 12

author img

By

Published : Jun 22, 2020, 10:25 PM IST

जिल्ह्यातील कोरोनाचा वेग आता मंदावला असून गेल्या तीन दिवसात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. जिल्ह्यात आढळलेल्या 160 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 143 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, 4 रुग्णांचा मृत्यू आणि 1 रुग्ण मुंबईला उपचारासाठी गेल्याने जिल्ह्यात आता फक्त 12 सक्रिय रुग्ण आहेत.

जिलह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल
जिलह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल

सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील आणखी 13 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 143 झाली आहे. तर, सद्यस्थितीत जिल्ह्यात फक्त 12 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली आहे. दरम्यान गेल्या तीन दिवसात एकही रुग्ण आढळला नसून रुग्ण बरे होत आले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याने कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 25 मार्चला पहिला कोरोना बाधीत रुग्ण आढळला होता. त्यात महिनाभरांनतर 29 एप्रिलला दुसरा रुग्ण आढळला. त्यांनतर मे महिन्यात मुंबईमधून येणाऱ्या चाकरमान्याची संख्या वाढली. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत गेली आणि 160 रुग्ण आढळले आहेत. मात्र, कोरोनाचा वेग आता मंदावला असून गेल्या तीन दिवसात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. तसेच बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. जिल्ह्यात आढळलेल्या 160 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 143 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, 4 रुग्णांचा मृत्यू आणि 1 रुग्ण मुंबईला उपचारासाठी गेल्याने जिल्ह्यात आता फक्त 12 सक्रिय रुग्ण आहेत.

अ.क्र विषय संख्या
1. पाठविण्यात आलेले एकूण नमुने - 3,232
2. अहवाल प्राप्त झालेले नमुने - 3,175
3. आतापर्यंत पॉजिटिव्ह आलेले नमुने - 160
4. निगेटिव्ह आलेले नमुने - 3,015
5. अहवाल प्राप्त न झालेले नमुने - 57
6. सध्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण - 12
7. इतर जिल्हे व इतर राज्यातील रुग्ण - 1 (मुंबई)
8. मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या - 4
9. डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण - 143
10. विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण - 29

बाधित संशयित
अ डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल 4 17
ब डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर 8 0
क कोविड केअर सेंटर 0 0

11. आजरोजी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती - 2,329
12. संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती - 20,216
13. शासकीय संस्थांमधील अलगीकरणातील व्यक्ती - 77
14. गाव पातळीवरील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती - 18,068
15. नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती - 2,071
16. 2 मे 2020 पासून आतापर्यंत जिल्ह्यात आलेल्या व्यक्ती - 106,158

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.