सिंधुदुर्ग : या भागात अचानक आग लागण्याची घटना घडली. याठिकाणी नजीक वस्ती नसल्याने सुरुवातीला आग लागल्याचे लक्षात आले नाही. या आगीमध्ये तुकाराम मोरजकर, राजन मोरजकर, राजा सावंत, प्रमिला मोरजकर, सुंदर सावळ यांची काजू बागायती जळून खाक झाली. तसेच, सागवान, जांभूळ झाडे देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. स्थानिकांनी पाणी व मातीच्या साहाय्याने आग विझविण्यात यश मिळवले त्यामुळे अन्य लोकांच्या बागा वाचल्या आहेत. दरम्यान, सरपंच प्रियांका नाईक, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, निलेश मोरजकर यांच्यासह ग्रामस्थांनी आग विजवण्याचे मोठे प्रयत्न केले. मात्र, बाग वाचली नाही.
बंब उपलब्ध झाला नाही : आग आगल्यानंतर लागलीच अग्निशमन दलाला कळवण्यात आले होते. मात्र, सावंतवाडी, कुडाळ, मालवण नगरपालिकेकडून ते उपलब्ध झाला नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, पंचनामा झाला नसल्याने अधिकृत नुकसानीचा आकडा समजू शकला नाही. मात्र, 5 एकर मधील धारत्या काजू पाहता अंदाजे 20 लाखाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी आता हंगाम आलेलाल असतानाच हे नुकसान झाल्याने आमच्या तोंडातील घास गेला आहे अशी भावना व्यक्त करत येथील शेतकऱ्यांनी आपल्यालाला सरकारने मदत करावी अशी मागणी केली आहे.
कणकवली तालुक्यातही लागली आग : जिल्ह्यात वनवे लागण्याचे प्रमाण वाढले आहे. कणकवली तालुक्यातील पियाळी या गावात ऊस आणि काजू बागायतीला आग लागली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भर दुपारी आग लागल्यानंतर वाऱ्याचा वेग ही वाढला होता. त्यामुळे अजूनही काही वेळातच रौद्ररूप धारण केले. दरम्यान, ऊस शेती आगीच्या विळख्यात आली आणि हा भडका लगतच्या काजू बागेत देखील गेला. गतवर्षीही याच ठिकाणी आग लागली होती. त्याची अद्याप नुकसान भरपाई मिळाली नसल्याची माहिती येथील बागायतदार शेतकरी रवींद्र उर्फ बाबू घाडीगांवकर यांनी सांगितले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू हंगाम सुरू : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या काजू हंगाम सुरू झाला आहे. काजू बागायती चांगल्याच बहरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वनवे लागण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. काही ठिकाणी मानवी चुकीमुळे वनवे लागतात. काही ठिकाणी वैयक्तिक द्वेषातून वनवे लावले जातात. यामध्ये नैसर्गिक संपत्ती सोबतच खाजगी मालमत्तेचे नुकसान वाढले आहे.
हेही वाचा : अग्निवीर योजना आरएसएसकडून आली; राहुल गांधींचा लोकसभेत घणाघात