ETV Bharat / state

अखेर टॅक्सीच्या दरात 3 रुपयांनी वाढ - टॅक्सी दरवाढ

गोव्यात मागच्या काही दिवसांपासून कोविड काळातही टॅक्सी भाडे दरवाढीचा मुद्दा गाजला. या विषयाला अखेर राज्य सरकारने प्रतिकिलोमीटर 3 रुपयांची दरवाढ देऊन ब्रेक लावलाय. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सर्वच टॅक्सी चालकांना डिजिटल मीटर बंधनकारक करण्यात आला आहे. हे मीटर न बसवणाऱ्या टॅक्सी चालकांचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली आहे.

गोवा
गोवा
author img

By

Published : Aug 5, 2021, 10:23 PM IST

पणजी - गोव्यात अखेर टॅक्सीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. राज्य सरकारनें प्रतिकिलोमीटर 3 रुपये अशी अतिरिक्त दरवाढ निश्चित केली आहे.

मागच्या काही महिन्यांपासून राज्यात टॅक्सी भाडे दरवाढीच्या मागणीसाठी विविध टॅक्सी चालक संघटनांनी राज्य सरकार विरोधात आंदोलने केली. गोवा माईल्स प्रणाली बंद करण्याचीही मागणी या संघटनांनी सरकारकडे केली. ऐन कोविडची दुसरी लाट जोमात असताना या संघटनांनी पणजीतील आझाद मैदानात आपल्या कुटुंबियांसह आंदोलन केले. मात्र सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहून गोवा माईल्स प्रणाली न हटविणार असल्याची भूमिका सरकारने घेतली होती. अखेर सरकारने टॅक्सी भाड्यात प्रतिकिलोमीटर 3 रुपये अशी अतिरिक्त दरवाढ निश्चित केली आहे.

डिजिटल मीटर न बसवल्यास टॅक्सीचा परवाना रद्द - वाहतूक मंत्री

उच्च न्यायालयाने सर्वच टॅक्सी चालकांना डिजिटल मीटर बंधनकारक केले आहेत. राज्यात डिजिटल मीटर बसवण्यास टॅक्सी चालकांचा विरोध होता. मात्र वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्यास वाहतूक टॅक्सी धारकांचा परवाना रद्द करणार असल्याचा इशारा दिला. त्यामुळे राज्यात डिजिटल मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

गोवा माईल्स प्रणाली हटविण्याची टॅक्सी चालकांची मागणी

राज्यात अनेक देशी-विदेशी पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. मात्र टॅक्सी चालक आपल्या मर्जीनेच त्यांच्याकडून भाडेवसुली करतात. याविषयी अनेक तक्रारी सरकारपर्यंत पोहोचल्या. यानंतर सरकारने गोवा माईल्स प्रणाली विकसित करून त्यानुसार या टॅक्सी चालकांना भाडे आकारण्यास सांगितले होते. मात्र अनेक टॅक्सी चालकांनी यास विरोध करत आंदोलन करून ही प्रणाली हटविण्याची मागणी केली. मात्र सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहत कोणत्याही परिस्थितीत गोवा माईल्स प्रणाली हटविणार नसल्याचं सांगण्यात आले होते.

अतिरिक्त लुटमारीला बसणार आळा

राज्यात अद्याप टॅक्सीला मीटर बसविण्यात आले नाहीत. मात्र डिजिटल मीटर बसवण्याची प्रक्रिया आता राज्यात सुरू झाली आहे. आतापर्यंत 137 जणांनी मीटर बसवले आहेत. 513 जणांनी मीटर बसवण्यासाठी नोंदणी केली आहे. राज्यात सध्या 3584 अधिकृत परवानाधारक टॅक्सी चालक आहेत. दरम्यान राज्यात सर्व टॅक्सी चालकांनी डिजिटल मीटर बसवल्यानंतर प्रवाशांची होणारी अतिरिक्त भाड्याची लूटमार थांबली जाईल, असा विश्वास वाहतूक मंत्र्यानी व्यक्त केला आहे.

सध्याचे टॅक्सी दर :-

* 4 सीटर - प्रथम 80 किलोमीटरला 2500 ते 3000 रुपये, 80 किलोमीटरनंतर 25 रुपये प्रतिकिलोमीटर.

* 7 सीटर - प्रथम 80 किलोमीटरला 3000 ते 3500 रुपये, 80 किलोमीटरनंतर 30 रुपये प्रतिकिलोमीटर.

राज्यात विमान प्रवासापेक्ष टॅक्सी प्रवास महाग -

राज्यात अनेक प्रवासी पर्यटनासाठी विमान प्रवास करत येतात. मात्र विमानतळावर उतरल्यानंतर टॅक्सी चालकांचे भाव ऐकून विमानप्रवासापेक्षा टॅक्सी प्रवास खूपच महाग असल्याची कुजबुज प्रवाशांकडून होते.

हेही वाचा - कोकणासाठी म्हाडाची ८ हजार २०५ घरे तर मुंबईसाठीचा निर्णय आठ दिवसांत - जितेंद्र आव्हाड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.