सिंधुदुर्ग - 15 ते 24 एप्रिल या कालावधीत जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमधील झालेल्या 7 रुग्णांच्या मृत्युने जिल्हावासियांच्या मनात भीती निर्माण झाली होती. मात्र, जिल्हावासियांनी घाबरण्याचे कारण नाही. कारण त्या व्यक्तींचा मृत्यू कोरोनाने झालेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
यातील चार व्यक्तींचा मृत्यू टीबीने झाला आहे. तर, एकाचा मृत्यू अल्कोहोलिक असल्याने झाला असून दुसऱ्या एका रुग्णाचा मृत्यू मधूमेह वाढल्याने झाला आहे. तर एका महिलेचा मृत्यू गंभीर आजाराने झाला आहे. या सर्व रुग्णांचे कोरोना नमूने निगेटिव्ह आले आहेत. तापाच्या रुग्णास आयसोलेशन कक्षात दाखल करण्याचे केंद्र शासनाचे निर्देश असल्यानेच हे सर्व रुग्ण आयसोलेशन कक्षात दाखल होते, असे पालकमंत्री उदय सामंत यानी स्पष्ट केले आहे.