सिंधुदुर्ग - जिल्हा हा केंद्र सरकारच्या कोरोनाबाधित जिल्ह्यांच्या यादीत ग्रीन झोनमध्ये टाकण्यात आला आहे. ही यादी 30 एप्रिलला प्रसिद्ध करण्यात आली असून मागच्या आठवड्यातील अहवालानुसार केंद्राने जिल्हा ग्रीन झोनमध्ये टाकला आहे. आता जिल्ह्यात एक रुग्ण असल्याने तसा पाठपुरावा केंद्राकडे सुरू असल्याचे सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकारने दिलेल्या यादीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा ग्रीन झोनमध्ये दाखवण्यात आला आहे. तथापि सध्या जिल्ह्यांमध्ये एक रुग्ण पॉझिटिव असल्यामुळे याविषयी केंद्रस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. सध्या केंद्राने गेल्या आठवड्यातील अहवालाच्या आधारावर झोन तयार केले आहेत. त्यामुळे नुकताच सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडलेल्या रुग्णाची नोंद झाली नसल्यामुळे तसेच केंद्र शासनाच्या नियमानुसार गेले 19 दिवस ज्या ज्या क्षेत्रामध्ये एकही कोरणा रुग्ण आढळलेला नाही अशी क्षेत्र ग्रीन झोन मध्ये येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नुकताच एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला आहे याविषयी केंद्र स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. तीन मे नंतर राज्य शासन व केंद्र सरकार यांच्याकडून येणाऱ्या सूचनांनुसार निर्णय घेतले जातील असे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी स्पष्ट केले आहे.