ETV Bharat / state

कोरोना योद्ध्यांची व्यथा : कंत्राटी डॉक्‍टरांवर उपासमारीची वेळ, निधी नसल्याने मानधन रखडले

author img

By

Published : Aug 18, 2020, 6:22 PM IST

डॉ. महेश खलिपे म्हणाले, की एका महिन्याला १८ लाख रुपये निधी लागतो. त्यामुळे दोन महिन्यांसाठी ३६ लाख रुपये निधी आवश्‍यक आहे. ऑगस्ट महिन्यात गणपती असल्याने या महिन्याचे सुद्धा मानधन देण्याची विनंती शासनाकडे केली आहे; मात्र अद्याप राज्य शासनाने निधी दिलेला नाही, असे डॉ. खलिपे यांनी सांगितले.

sindhudurg corona warriors didnt get two months paymen

सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील ३६ कंत्राटी डॉक्‍टरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचे जून आणि जुलैचे मानधन मिळालेले नाही. यासाठी आवश्‍यक असलेला ३६ लाख रुपये निधी महाराष्ट्र शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही मिळाला नाही. एका डॉक्‍टरला ४० हजार रुपये मानधन दिले जाते. जिल्हा परिषदेच्या वित्त समिती सभेत ही बाब उघड झाली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी देखील या डॉक्‍टरांचे दोन महिन्यांचे मानधन मिळाले नसल्याचे कबूल केले आहे.

डॉ. महेश खलिपे म्हणाले, की एका महिन्याला १८ लाख रुपये निधी लागतो. त्यामुळे दोन महिन्यांसाठी ३६ लाख रुपये निधी आवश्‍यक आहे. ऑगस्ट महिन्यात गणपती असल्याने या महिन्याचे सुद्धा मानधन देण्याची विनंती शासनाकडे केली आहे; मात्र अद्याप राज्य शासनाने निधी दिलेला नाही, असे डॉ. खलिपे यांनी सांगितले.

कोरोना संसर्गाच्या काळात सर्वाधिक जबाबदारी डॉक्टर, नर्स,आणि आरोग्य यंत्रणेशी निगडित असलेल्या कर्मचाऱ्यांनी निभावली. स्वतःचा जीव धोक्यात घालून आजही ते काम करत आहेत. अशा या कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न शासनाकडे प्रलंबित आहेत. अनेकांना मानधन नाही तर अनेक पदे रिक्त असल्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांवर अठरा ते २४ तास ड्युटी करण्याची वेळ आली आहे. त्यात अनेकांना तर तुटपुंजा पगार दिला जातो. तर कंत्राटी आयुर्वेद व होमिओपॅथी वैद्यकीय अधिकाऱ्यांना गेली २ महिने पगारच दिलेला नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता जिल्हा, उपजिल्हा रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रामंध्ये काम करणारे ४० आयुर्वेदिक व होमिओपॅथी कंत्राटी डॉक्टर आहेत. गेले तीन महिने कोरोनाच्या काळात हे योध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. मात्र, त्यांना २ महिन्याचा एक रुपया सुद्धा पगार दिला नाही. या आयुर्वेदिक व होमिओपॅथी डॉक्टरांना अशा अडचणीच्या ठिकाणी ड्युट्या दिल्या जातात की प्रवासातच ते मेटाकुटीला येतात. उदाहरणार्थ वेंगुर्ले चा कर्मचारी आंबोली किंवा फोंडाघाट ,खारेपाटण अशा चेकपोस्टच्या ठिकाणी ड्युटीवर पाठविला जातो. त्यात त्याला वाहतुकीचा भत्ता नाही. हे सर्व करत असताना किमान पगारतरी वेळेवर झाला पाहिजे होता ते सुद्धा नाही. ‘समान काम समान वेतन’ हा कायदा आपल्याकडे आहे. मात्र, या कंत्राटी कामगारांना आणि डॉक्टरांना लागू नाही. त्यामुळेचआयुर्वेदिक डॉक्टरांना कर्नाटक प्रमाणे किमान ६५००० रुपये वेतन दिले जावे, अशी मागणी होऊ लागली आहे. तुटपूंज्या पगारावर हे काम करत आहेत. मात्र दिली जाणारी जबाबदारी मोठी असते,काम खूप असते. जीव धोक्यात घालून काम करावे लागते. चेकपोस्टवर काहीं सुविधा नसताना काम करावे लागते.

महिला डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना बाथरूम सुद्धा स्वतंत्र नाहीत अशी स्थती आहे. कायमस्वरूपी सेवेत असलेल्या आणि भरपूर पगार असलेल्या डॉक्टर किंवा कर्मचाऱ्यांच्या पेक्षा जास्त काम या कंत्राटी डॉक्टर आणि कामगारांना दिले जाते. त्यात कोविड योद्धा म्हणून दहा लाखाचा मृत्यूनंतर दिला जाणारा इन्शुरन्स सुद्धा कंत्राटी आयुर्वेदिक व होमिओपॅथी डॉक्टरांचा उतरलेला नाही आणि केला असेल तर त्याचा स्पष्ट उल्लेख असलेला जीआर नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.