ETV Bharat / state

Nitesh Rane Bail Application : सिंधुदुर्गात वातावरण तापले, बंदोबस्त वाढवला.. नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी सुरू - पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते

आमदार नितेश राणे ( MLA Nitesh Rane ) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात ( Santosh Parab Attack Case ) अटक होण्याच्या भीतीने राणे यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी जिल्हा न्यायालयात ( Sindhudurg District Court ) धाव घेतली आहे. त्यावर सुनावणी सुरु झाली आहे. नितेश राणेंना अटक होण्याच्या शक्यतेने सिंधुदुर्गात वातावरण तापले असून, जिल्हाभरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी सुरू

author img

By

Published : Dec 28, 2021, 5:11 PM IST

सिंधुदुर्ग - सतिश सावंत यांचे समर्थक संतोष परब हल्लाप्रकरणात ( Santosh Parab Attack Case ) आ. नितेश राणेंवर ( MLA Nitesh Rane ) अटकेची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे अटक टाळण्यासाठी नितेश राणे यांनी कोर्टात धाव घेतली ( Nitesh Rane Bail Application ) आहे. यावर सुनावणीला सुरुवात झाली असून राणेंच्या बाजूनं वकिलांची फौज कोर्टात लढत देणार आहे. या घटनेतील फिर्यादी संतोष परब हेदेखील जिल्हा न्यायालयात ( Sindhudurg District Court ) दाखल झाले आहेत.

सिंधुदुर्गात वातावरण तापले, बंदोबस्त वाढवला.. नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी सुरू

न्यायालयाबाहेर मोठा बंदोबस्त

भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन प्रकरणात सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होत आहे. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणीला सुरुवात झालीय. यासाठी दोन्ही बाजूंनी वकिलांची फौज उभी करण्यात आली आहे. फिर्यादी संतोष परब हे देखील जिल्हा न्यायालयात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे जिल्हा न्यायालयाच्या बाहेर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

जिल्ह्यात पोलीस फौजफाटा वाढवला

आमदार नितेश राणे हे अद्यापही जिल्ह्यात दाखल झाले नाहीत त्यांचा शोध घेण्याकरिता जिल्हा पोलिसांचे ( Sindhudurg District Police ) पथक गोवा आणि मुंबईत दाखल झाले आहे आमदार नितेश राणे हे सोमवारी रात्री नारायण राणे ( Minister Narayan Rane ) यांना गोवा विमानतळावर ( Goa Airport ) भेटल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान आमदार नितेश राणे यांना अटक झाल्यास जिल्ह्यातील वातावरण तापू शकते, हे लक्षात घेता जिल्ह्यात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कणकवली मध्ये पोलिस कुमक वाढविण्यात आली आहे

पोलीस महासंचालक सिंधुदुर्गात

राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे ( DGP Sanjay Pande ),अतिरिक्त पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल (Additional DGP Sanjiv Kumar Singhal ), कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते ( IG Sanjay Mohite ) यांच्यासह कोकण विभागातील पोलीस अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाण मांडून आहेत.

हेही वाचा : नितेश राणेंना अटक होणार? नारायण राणेंनीच दिले संकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.