ETV Bharat / state

क्वारंटाईनचा कालावधी कमी केल्यास सरपंच राजीनामा देणार

author img

By

Published : Jul 16, 2020, 2:02 PM IST

केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाने क्वारंटाईनसाठी 14 दिवसांचा कालावधी निश्‍चित केला आहे. तर चतुर्थीसाठी येणार्‍या चाकरमान्यांसाठी 7 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी करण्याबाबत धोरण आखले जात आहे. तशी मागणी विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी देखील केली आहे. मात्र, क्वारंटाईन कालावधी कमी करण्याला आमचा विरोध असल्याचे सरपंच संघटनेने म्हटले आहे.

sarapanch
क्वारंटाईनचा कालावधी कमी केल्यास सरपंच राजीनामा देणार

सिंधुदुर्ग - चौदा दिवसाच्या क्वॉरंटाईन कालावधी बदलून 7 किंवा 10 दिवसाचा करणार असाल तर ग्रामसमितीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊ. तसेच असहकार पुकारू असा इशारा सरपंच संघटनेने प्रशासनला दिला आहे. मात्र, स्वॅब टेस्ट निगेटिव्ह असलेल्या चाकरमान्यांच्या जिल्हा प्रवेशास आमची हरकत नसल्याचे सरपंच संघटनेचे अध्यक्ष संतोष राणे यांनी येथे स्पष्ट केले.

संतोष राणे म्हणाले, केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाने क्वारंटाईनसाठी 14 दिवसांचा कालावधी निश्‍चित केला आहे. तर चतुर्थीसाठी येणार्‍या चाकरमान्यांसाठी 7 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी करण्याबाबत धोरण आखले जात आहे. तशी मागणी विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी देखील केली आहे. मात्र, क्वारंटाईन कालावधी कमी करण्याला आमचा विरोध आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी आपापल्या गावात कोरोनाची साथ येऊ नये, यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली आहे. त्यात क्वारंटाईन कालावधी कमी केल्यास जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे.

दरम्यान, मुंबईहून येणार्‍या चाकरमान्यांनी ते कोरोना निगेटिव्ह असल्याचा अहवाल आणला तसेच त्याची पुष्टी जिल्हा आरोग्य विभागाने केली तर अशा चाकरमान्यांना गावात येण्याबाबत आमची कोणतीच हरकत नाही. मात्र, चाकरमान्यांच्या जिल्हा प्रवेशाबाबत जिल्हा प्रशासनाने सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींना एकत्रित बोलावून निर्णय घ्यावा असेही राणे म्हणाले. चाकरमान्यांसाठी मोफत प्रवास हवा परराज्यातील व्यक्तींना त्यांच्या गावापर्यंत जाण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मोफत व्यवस्था करून दिली. त्याच धर्तीवर कोकणात येणार्‍या चाकरमान्यांसाठी राज्याने मोफत सुविधा उपलब्ध करावी अशी सरपंच संघटनेची मागणी असल्याचे राणे म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.