ETV Bharat / state

'जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणीच वैद्यकीय महाविद्यालय उभारणीची प्रक्रिया सुरू करा'

author img

By

Published : Nov 10, 2020, 6:40 AM IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. या महाविद्यालयाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल एक बैठक बोलावली होती.

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे

मुंबई - सिंधुदुर्गमधील ओरोस येथील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातच प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी सिंधुदुर्ग येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, आमदार वैभव नाईक, माजी राज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत , मुख्य सचिव संजय कुमार, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, वैद्यकीय शिक्षणचे संचालक डॉ. तात्याराव लहाने आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय एकाच परिसरात -

वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय एकाच परिसरात व जागेवर असेल तर सर्वांसाठी सोयीचे होईल. सर्व सुविधांचा योग्य उपयोग करून घेता येईल. त्यामुळे सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱयांनी आता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नावाने असलेली जमीन वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नावाने करण्याची प्रक्रिया सुरू करावी. वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने समन्वयाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असणारा निधी, मनुष्यबळ, तांत्रिक उपलब्धता याबाबतचा प्रस्ताव तयार करून सादर करावा, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

वैद्यकीय महाविद्यालयासाठी 20 एकर जागा -

भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषानुसार नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी किमान सलग 20 एकर जागा असणे आवश्यक आहे. सध्या जिल्हा रुग्णालयाकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयसाठी आवश्यक असणारी जागा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱयांनी जागा त्वरित हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांनी केल्या.

कामाला गती द्या -

कोकणात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात यावे ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या कामाला गती दिला जावी, अशी मागणी या बैठकीदरम्यान उदय सामंत यांनी केली. या महाविद्यालयासाठी 25 किमी दूर झारापच्या पर्यायी जागेचा देखील विचार करण्यात आला होता. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणीच वैद्यकीय महाविद्यालय उभारले जावे असे नमूद केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.