सिंधुदुर्ग - मागील दहा ते पंधरा दिवस नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राणे विरूद्ध केसरकर असा आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगला होता. यामध्ये राणे समर्थक संजू परब यांनी बाजी मारली आहे. त्यांनी 309 मतांनी सेनेच्या बाबू कुडतरकर यांचा पराभव केला आहे.
भाजपचे खासदार नारायण राणे आणि दिपक केसरकर यांनी प्रतिष्ठेची केलेली ही निवडणूक अखेर भाजपने जिंकली आहे. यामुळे आमदार दिपक केसरकर यांना स्वत:च्या बालेकिल्ल्यातच सुरूंग लागलायं.