ETV Bharat / state

'हा' तर ठाकरे सरकारचा नवा उद्योग...आता नारायण राणे मैदानात! - arnab goswami arrest

आज सकाळी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. त्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचे चित्र आहे. आता भाजपाचे राज्यसभेवरील खासदार नारायण राणे यांनी अर्णब गोस्वामींची पाठराखण केली आहे.

narayan rane news
'उद्धव ठाकरे सरकारने चालवलेल्या या नव्या उद्योगाचा मी निषेध करतो'
author img

By

Published : Nov 4, 2020, 3:48 PM IST

Updated : Nov 4, 2020, 4:09 PM IST

सिंधुदुर्ग - रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांची अटक ही सूड भावनेतून केल्याचा आरोप भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे सरकारने चालवलेल्या या नव्या उद्योगाचा मी निषेध करतो, असे ते म्हणाले.

'उद्धव ठाकरे सरकारने चालवलेल्या या नव्या उद्योगाचा मी निषेध करतो'

सिंधुदुर्गात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अर्णबची पाठराखण केली आहे.

अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात रायगडमध्ये २०१८ साली गुन्हा दाखल झाला होता. एका व्यवसायिकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अर्णबवर खटला दाखल झाला होता. ही केस आता क्लोज झाली आहे. त्यामुळे सुडाने आणि आकसाने उद्धव ठाकरे सरकारने जे उद्योग सुरू केलेत, त्यातील हा नवा उद्योग असून मी त्याचा निषेध करतो, असे नारायण राणे म्हणाले.

काही खटल्यांमध्ये पोलिसांचा पराक्रम जनतेला माहिती

अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबियांना त्यांच्या मुलाला जी वागणूक पोलिसांनी दिली त्याचा मी निषेध करतो. अशी कारवाई मुंबई पोलिसांची आणि रायगड पोलिसांनी अतिरेक्यांविरुद्ध, ड्रग्ज सप्लाय करणाऱ्यांविरुद्ध आणि बलात्कार करून खून करणाऱ्यांविरुद्ध केली नाही. सुशांतची केस, दिशाची केस, रियाची केस नजीकच्या आहेत. तिथे पोलिसांनी केलेला पराक्रम जनतेला माहिती आहे. तेव्हा एका संपादकाविरोधात जुन्या खटल्याचा संदर्भ देऊन पाचशे पाचशे पोलीस घेऊन जाऊन अटक करावी, असं धाडस कोण

मुख्यमंत्र्यांकडून सत्तेचा दुरुपयोग

मुंबईत अतिरेकी असतील, ड्रग्ज पुरवठा करणारे असतील, लहान मुलांना पळवून नेऊन व्यापार करणारे असतील, बलात्कार करून खून करणारे असतील, त्यांच्या विरुद्ध या पोलिसांकडून आतापर्यंत का कारवाई झाली नाही. या सरकारच्या प्रमुखांना कायद्याची जाण नाही. कायद्याची अंमलबजावणी कशी करावी, हे यांना माहिती नाही, असे राणे म्हणाले. सरकार चालवायला असमर्थ ठरलेली मंडळी, हे मुख्यमंत्री सत्तेचा दुरुपयोग करत आहेत. नेहमी शिवाजी महाराजांचं नाव सांगून सरकार चालवणारे त्यांचा कारभार, ही कारवाई पाहता त्यांनी महाराजांचं नाव घेणं बंद करावं, असे राणे म्हणाले.

अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाई झाल्यानंतर प्रसार माध्यमांचे प्रमुख गप्प आहेत. नेहमीच पत्रकारांवर अन्याय होतोय म्हणून गळा काढणारे आता गप्प का, असा प्रश्नही राणेंनी यावेळी उपस्थित केला.

Last Updated : Nov 4, 2020, 4:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.