ETV Bharat / state

मालवणच्या रॉक गार्डनच्या सौंदर्यात 'म्युझिकल फाउंटन'ची भर

मालवण रॉक गार्डन येथील या फाउंटनची उभारणी भव्य दिव्य अशी करण्यात आली आहे. साउंड सिस्टिमवर लागलेली गाणी त्याच्या तालावर उडणारे पाण्याचे फवारे, कलरफुल लायटिंग. या स्वरूपात म्युझिकल फाउंटनचा नजरा असणार आहे. लवकरच लोकार्पण होऊन हा प्रकल्प पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे.

मालवण ड्रीम प्रोजेक्ट म्युझिकल फाउंटन
मालवण ड्रीम प्रोजेक्ट म्युझिकल फाउंटन
author img

By

Published : Nov 13, 2020, 12:48 PM IST

Updated : Nov 13, 2020, 1:03 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्याच्या सागरी पर्यटनाची राजधानी अशी ओळख असलेल्या मालवणमध्ये दर वर्षी पर्यटकांचा ओघ वाढत असतो. पर्यटकांना नवे काहीतरी देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असलेल्या मालवण नगरपालिकेचा 'म्युझिकल फाउंटन' प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. या प्रकल्पाची चाचणी यशस्वी ठरली आहे.

मालवण ड्रीम प्रोजेक्ट म्युझिकल फाउंटन
मालवण ड्रीम प्रोजेक्ट म्युझिकल फाउंटन
मालवणच्या रॉक गार्डनच्या सौंदर्यात 'म्युझिकल फाउंटन'ची भर

मालवण रॉक गार्डन येथे म्युझिकल फाउंटन

जिल्हा वार्षिक योजना पर्यटन निधीतून तब्बल १ कोटी खर्चाचा हा प्रकल्प मालवण रॉक गार्डन येथे उभारणी करण्यात आला आहे. कलरफुल लाईट अन मुझिकच्या तालावर उडणारे पाण्याचे फवारे निश्चितच पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. मालवण नगरपालिकेचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या कोकण पट्ट्यात सद्यस्थितीत हा एकमेव असा म्युझिकल फाउंटन आहे. असा दावा करण्यात येत आहे.

हेही वाचा - कुंभार व्यावसायिक ग्राहकांच्या प्रतिक्षेत; मातीचे दिवे तसेच पडून

मालवणच्या सौंदर्यात भर

काही वर्षपूर्वी रॉक गार्डन येथे कलरफुल एलईडी लाईट बसवण्यात आल्या. येथील संपूर्ण परिसर पर्यटकांना आकर्षित करत आहे. खडकांवर आदळणाऱ्या लाटा, फेसळणारा समुद्र हा नजारा पाहत येथे आलेला प्रत्येकजण स्थिरावतो. सायंकाळी सूर्यास्ताचा नजाराही अनोखा असतो. गार्डनमध्ये मुलांना खेळण्यासाठी विविध खेळणी बसवण्यात आली आहेत. सर्वत्र बैठक व्यवस्थाही आहे. निळ्याशार आकाशाखाली हिरवळीवर बसण्याचा आनंद काही औरच आहे. रॉक गार्डनच्या या सौंदर्यात आता म्युझिकल फाउंटनची भर पडली आहे.

लवकरच लोकार्पण

मालवण रॉक गार्डन येथील या फाउंटनची उभारणी भव्य दिव्य अशी करण्यात आली आहे. साउंड सिस्टिमवर लागलेली गाणी त्याच्या तालावर उडणारे पाण्याचे फवारे, कलरफुल लायटिंग. या स्वरूपात म्युझिकल फाउंटनचा नजरा असणार आहे. लवकरच लोकार्पण होऊन हा प्रकल्प पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे.

हेही वाचा - दिवाळी आली तरी विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्राध्यापक वेतनापासून वंचित

Last Updated : Nov 13, 2020, 1:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.