ETV Bharat / state

सिंधुदुर्गात आतापर्यंत झालेल्या हत्यांची चौकशी करा, शिवसेनेचा नारायण राणेंवर पलटवार - विनायक राऊत लेटेस्ट न्यूज

स्वतःच्या चुलत भावाची हत्या झाली त्याबाबत काही बोलायच नाही. पण, सुशांतसिंहच्या मृत्यूवर टाहो फोडून रडायचे काम नारायण राणे करत आहेत. 2005पासून कणकवलीमध्ये किती हत्या झाल्या त्याचा तपास करण्यासाठी मुख्यमंत्री व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे लेखी मागणी करत आहोत, असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.

Vinayak Raut
विनायक राऊत
author img

By

Published : Aug 14, 2020, 1:01 PM IST

सिंधुदुर्ग - सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी नारायण राणे यांनी तत्परतेने पत्रकार परिषदेत घेतली. सुशांतसिंह आणि त्याच्या सेक्रेटरीची हत्याच झाली, अशी ठाम भूमिका राणे यांनी घेतली आहे. दुसऱ्यांच्या मृत्यूबाबत नारायण राणे बोलत आहेत. मात्र, स्वत:च्या सख्ख्या चुलत भावाच्या हत्येबाबत त्यांनी अजूनही चकार शब्दही उच्चारला नाही. त्यांचा भाऊ अंकुश राणेंची हत्या कोणी केली? हे राणेंनी सांगावे, असा सवाल खासदार विनायक राऊत यांनी उपस्थित केला आहे.

2005पासून कणकवलीमध्ये झालेल्या हत्यांची चौकशी होणार

स्वतःच्या चुलत भावाची हत्या झाली त्याबाबत काही बोलायचे नाही. पण सुशांतसिंहच्या मृत्यूवर टाहो फोडून रडायचे काम राणे करत आहेत. 2005पासून कणकवलीमध्ये किती हत्या झाल्या त्याचा तपास करण्यासाठी मुख्यमंत्री व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे लेखी मागणी करत आहोत, असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.

सुशांतच्या केसमध्ये आदित्य ठाकरेंचे नाव सर्वोच्च न्यायालयामध्ये नोंदवले गेले, याबाबत निलेश राणे यांनी कधी शोध लावला माहित नाही. सर्वोच्च न्यायालयाकडून वेगळे आदेश येतील, त्यावेळी महाराष्ट्र सरकार योग्य ती कारवाई करेल, असेही राऊत यांनी सांगितले.

दरम्यान, नारायण राणेंनी महाविकास आघाडी सरकार पडेल, असे वक्तव्य पुन्हा एकदा नारायण राणे यांनी केले आहे. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. नारायण राणे यांनी टूर-टूर करत रहावी. महाविकास आघाडीचे सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षे काढेल, असा पलटवार विनायक राऊत यांनी केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.