ETV Bharat / state

BJP Panel Won : ठाकरे गटाचा बालेकिल्ला ढासळू लागला ; 'या' निवडणुकीत भाजपने फडकवली पहिली विजयी पताका

author img

By

Published : Nov 14, 2022, 9:52 AM IST

मालवण तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत (Malvan Taluka Cooperative elections In Sindhudurg) १५ जागांवर विजय मिळवत महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला (BJP Panel won 15 seats MVA crushing defeat) आहे.

BJP Panel Won
भाजपने फडकवली पहिली विजयी पताका

सिंधुदुर्ग : ठाकरे गट शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मालवणात भाजपाने पहिला विजय मिळविला (Malvan Taluka Cooperative elections In Sindhudurg) आहे. तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत १५ जागांवर विजय मिळवत महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला (BJP Panel won 15 seats MVA crushing defeat) आहे.

प्रतिक्रिया देताना माजी खासदार निलेश राणे

विजयाची पताका : मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ निवडणुकीत भाजप पुरस्कृत श्री देव रामेश्वर, नारायण, सातेरी सहकार विकास पॅनेलने १५ ही जागांवर बहुमताने विजय मिळवला. महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनेलचे सर्व उमेदवार यावेळी पराभूत झाले आहेत. या विजयानंतर भाजपने जल्लोष केला. भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी मालवण येथे दाखल होत सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. शंभर टक्के स्वरूपात मिळालेल्या या विजयाने मी भावुक झालो. या विजयाची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब यांना दिली. त्यांनाही आनंद झाला. आगामी सर्व निवडणुकीत विजयाची ही पताका अशीच फडकत राहील. असे निलेश राणे (BJP Panel won 15 seats) म्हणाले.

विजयी उमेदवार : महेश बाळकृष्ण मांजरेकर, राजन जगन्नाथ गांवकर, कृष्णा पांडुरंग चव्हाण, राजेंद्र नारायण प्रभुदेसाई, कृष्णा ढोलम, रमेश (आबा) हडकर, विजय ढोलम, गोविंद गावडे, महेश गावकर, सरोज शिवाजी परब, अमृता अशोक सावंत, सुरेश चौकेकर, अशोक तोडणकर हे उमेदवार विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीचे जिल्हा बँक संचालक मेघनाद धुरी पराभूत झाले आहेत. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अजय हिर्लेकर यांनी काम (Malvan Taluka Cooperative elections) पाहिले.

ठाकरे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात विजय : ठाकरे गट शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचा मालवण हा बालेकिल्ला आहे. वैभव नाईक यांनी या ठिकाणावरून नारायण राणे यांच्या विजयी परंपरेला सुरुंग लावला होता. मालवण मधून सलग दोन वेळा आमदार झालेल्या नाईक यांना शह देण्यासाठी राणेंकडून वेळोवेळी ताकद लावली जात होती. अखेर शिवसेनेचे दोन भाग झाले आणि हळूहळू ठाकरेंच्या प्रामाणिक शिलेदाराचा हा बालेकिल्ला आता ढासळताना दिसत (BJP Panel Won) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.