ETV Bharat / state

Sindhudurg Rain : आंबोली मुख्य धबधब्याजवळ दरड कोसळली, तर भुईबावडा घाटरस्ता दुभंगला - सिंधुदुर्ग पाऊस माहिती

गेले चार दिवस जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे माडखोल धवडकी दरम्यान मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने परिसरातील घरात पावसाचे पाणी घुसले आहे. तसेच पावसामुळे आंबोली धबधब्यपासून दीड किलो मीटरच्या अंतरावर रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली असल्याची माहिती सावंतवाडी पोलीस निरिक्षक सचिन हुंदळेकर यांनी दिली आहे.

दरड कोसळली
दरड कोसळली
author img

By

Published : Jul 23, 2021, 5:52 PM IST

Updated : Jul 23, 2021, 6:05 PM IST

सिंधुदुर्ग - गेल्या आठवडाभर मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे सावंतवाडी-बेळगाव राज्यमार्गावर आंबोली मुख्य धबधब्याजवळ मोठी दरड कोसळली आहे. त्यामुळे सावंतवाडी-बेळगाव व कोल्हापूर मार्ग ठप्प झाला आहे. तर भुईबावडा घाटरस्ता मधोमध दुभंगला आहे. यामुळे कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

आंबोली मुख्य धबधब्याजवळ दरड कोसळली

आंबोली घाटात कोसळली दरड

गेले चार दिवस जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे माडखोल धवडकी दरम्यान मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने परिसरातील घरात पावसाचे पाणी घुसले आहे. तसेच पावसामुळे आंबोली धबधब्यपासून दीड किलो मीटरच्या अंतरावर रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली असल्याची माहिती सावंतवाडी पोलीस निरिक्षक सचिन हुंदळेकर यांनी दिली आहे. त्यामुळे आंबोली-सावंतवाडी हा राज्यमार्ग ठप्प झाला आहे. कोसळलेली दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून दुपारपर्यंत रस्ता मोकळा होईल, अशी माहिती पी. डब्ल्यू.डी. विभागाने दिली आहे.

भुईबावडा घाटरस्ता बनला जीवघेणा

कोल्हापूर आणि तळकोकणाला जोडणारा भुईबावडा घाटरस्ता घाटात मधोमध दुभंगला असून या रस्त्यातून अवजडसह सर्वच वाहनांची वाहतूक पोलिसांनी बंद केली आहे. करूळ घाटरस्ता दुरुस्तीचे काम सुरु असल्यामुळे 26 जुलैपर्यंत करूळ घाटातील सर्व वाहतूक याआधीच बंद करण्यात आली आहे. त्यामुळे गगनबावड्यातून वैभववाडी अथवा खारेपाटणच्या दिशेने जाणारा जवळचा मार्ग म्हणून भुईबावडा घाटरस्त्याचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात वाहनचालकांकडून होत आहे. त्यातच पिडब्ल्यूडी खात्यानेही कणकवली प्रांताधिकाऱ्यांना भुईबावडा घाटरस्ता धोकादायक असून अवजड वाहतूक बंद करण्याची विनंती केली होती. त्यानुसार 22 जुलैपासून भुईबावडा घाटातून होणारी अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दक्षता घेत सर्व वाहतूक केली बंद

दरम्यान भुईबावडा घाटात रस्ता मधोमध दुभंगला असल्यामुळे यामार्गे वाहतूक करणे म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. वैभववाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी अतुल जाधव यांना घाटरस्ता दुभंगल्याची माहिती मिळताच तत्काळ अधिकारी जाधव यांनी सहकारी कर्मचाऱ्यांसह भुईबावडा घाटात धाव घेतली. रस्ता दुभंगला असल्यामुळे कधीही जीवघेणा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. रस्ता दुभंगल्याची पाहणी केल्यानंतर संभाव्य अपघात टाळण्यासाठी जाधव यांनी तत्काळ बॅरिकेट्स लावत भुईबावडा घाटमार्गे होणारी सगळी वाहतूक बंद केली आहे. नागरिक आणि वाहनचालकांनी भुईबावडा घाट सर्व वाहतुकीसाठी बंद असल्याची नोंद घेत पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही साहयक पोलीस निरिक्षक अतुल जाधव यांनी केले आहे.

हेही वाचा -Maharashtra Floods : राज्यात अतिवृष्टी, पुराचे 54 बळी; पंतप्रधानांकडून मदतीची घोषणा

Last Updated : Jul 23, 2021, 6:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.