ETV Bharat / state

भयंकर स्फोटाच्या आवाजाने सिंधुदुर्गची किनारपट्टी हादरली - सिंधुदुर्ग किनारपट्टीवर आवाज

वेंगुर्ले, मालवण, देवगड येथील किनारपट्टीवर हा कानठळ्या बसवणारा आवाज ऐकू आला आणि एकच भीतीचे वातावरण किनारी भागातील लोकांमध्ये निर्माण झाले. काहींच्या मते भूकंप झाल्याची चर्चा किनारी भागात सुरू होती. तर काहीजण भीतीच्या सावटाखाली होते. अखेर मालवणचे तहसीलदार अजय पाटणे यांनी हा आवाज नेमका कशाचा आहे, हे सांगितले आणि नागरिकांना घाबरून जाऊ नये असे आवाहन केले आहे.

सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग
author img

By

Published : Apr 15, 2021, 10:02 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्याची किनारपट्टी आज भयंकर अशा कानठळ्या बसवणारा स्फोटाच्या आवाजाने हादरून गेली. वेंगुर्ले, मालवण, देवगड येथील किनारपट्टीवर हा कानठळ्या बसवणारा आवाज ऐकू आला आणि एकच भीतीचे वातावरण किनारी भागातील लोकांमध्ये निर्माण झाले. काहींच्या मते भूकंप झाल्याची चर्चा किनारी भागात सुरू होती. तर काहीजण भीतीच्या सावटाखाली होते. अखेर मालवणचे तहसीलदार अजय पाटणे यांनी हा आवाज नेमका कशाचा आहे, हे सांगितले आणि नागरिकांना घाबरून जाऊ नये असे आवाहन केले आहे.

सिंधुदुर्ग

आवाजाने किनारपट्टी हादरली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून संचारबंदीची अमंलबजावणी सुरू असतानाच मालवणसह जिल्ह्याच्या किनारपट्टीवर आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाने किनारपट्टी हादरली. आवाज एवढा मोठा झाला होता की, तो आवाज नेमका कशाचा याचे उत्तर शोधण्यासाठी प्रशासनासह नागरिकही कामाला लागले. मात्र, दुपार झाली तरी सारेच अनभिज्ञ होते. मालवण तालुक्यात अनेक ठिकाणी आज सकाळी हा मोठा आवाज ऐकू आला. मालवण शहरासह वायरी, तारकर्ली, कोळंब, कातवड, आनंदव्हाळ, हडी, आचरा, कुंभारमाठ, कट्टा, मसुरे, देवबाग आदी व इतर ठिकाणच्या नागरिकांनी हा आवाज ऐकला. या आवाजाच्या वेळी काहींच्या घराचे दरवाजे, खिडक्या, पत्रे, घरातील सामान हलले, अशी माहिती काही नागरिकांनी दिली आहे. मात्र, हा आवाज नेमका कसला हे कळू शकलेले नाही. भूकंप झाल्याचा अंदाज काहीजण व्यक्त करत आहेत. तर हा आवाज किनारपट्टी भागातून आला असल्याचे काहीनी सांगत समुद्रात स्फोट झाल्याने किंवा समुद्रातील हालचालींमुळे हा आवाज झाल्याचे काहींचे म्हणणे होते. मात्र, आवाजाबाबत कोणही ठोस माहिती देऊ शकत नव्हता.

‘तो’ आवाज नौदलाच्या प्रात्यक्षिकांचा

दरम्यान, या आवाजाबाबत वेगवेगळे तर्कवितर्क मांडले गेले. पण आता ‘त्या’ आवाजामागचं गुपित समोर आले आहे. मालवणसह देवगड तालुक्यातील कुणकेश्वरपर्यंतच्या सुमारे ५० कि. मी. लांब किनारपट्टीवर ऐकू आलेला कानठिळ्या उठविणारा ‘तो’ आवाज गोव्याच्या दिशेने खोल समुद्रात नौदलाने सुरू केलेल्या प्रात्यक्षिकांचा असल्याची खातरजमा सागरी सुरक्षा यंत्रणेने केली आहे. मालवणचे तहसीलदार अजय पाटणे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. गुरुवारी सकाळी ११.४० वाजताच्या सुमारास झालेल्या या आवाजामुळे किनारपट्टी हादरून गेली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.