ETV Bharat / state

सिंधुदुर्गात मुलांचा आदर्शवत उपक्रम ; शिमग्यात जमलेल्या निधीतून निराधार कुटुंबांना मदत - Holi festival in Kokan Region

शिमग्याच्या सोंगातून जमलेला निधी जिल्ह्यातील तारकर्ली गावातल्या मुलांनी निराधार कुटुंबाना देऊन मदतीचा हात पुढे केला आहे. शिवाय एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे या मुलांचे समाजातून कौतुक होत आहे.

मुलांनी निराधार कुटुंबांना मदत केली
मुलांनी निराधार कुटुंबांना मदत केली
author img

By

Published : Apr 8, 2021, 5:53 PM IST

सिंधुदुर्ग - कोकणात होळी उत्सव अर्थात शिमगा सण सुरु आहे. या काळात गावागावात सोंगे काढली जातात. अशाच शिमग्याच्या सोंगातून जमलेला निधी जिल्ह्यातील तारकर्ली गावातल्या मुलांनी निराधार कुटुंबाना देऊन मदतीचा हात पुढे केला आहे. शिवाय एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे या मुलांचे समाजातून कौतुक होत आहे.

तारकर्ली गावातील बाळ गोपाळांचे आदर्शवत काम

कोरोनामुळे सगळीकडे सध्या चिंतेचं वातावरण असताना तारकर्ली गावातील बाळ गोपाळांनी मात्र समाजासमोर एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. तारकर्ली गावातील रोहन नरेश कांदळगावकर, यज्ञेश वंदन केरकर, वेदांत सदाशिव सागवेकर, ईशान सदाशीव सागवेकर, प्रणित भार्गव कांदळगावकर, निनाद गणपत मोंडकर, रिषभ श्रीधर खराडे, हार्दिक सतिश टिकम, सिद्धेश नरेश टिकम व नैतिक धोंडी कांदळगावकर या बाळगोपाळांनी होळी सणा दरम्यान गावात शिमग्याचे सोंग काढून निधी गोळा केला व या गोळा झालेल्या निधी मधील काही भाग गावातील दोन गरजू कुटुंबांना मदत म्हणुन दिला.

या उपक्रमाचे हे आहे तिसरे वर्ष

विशेष म्हणजे कोरोना काळात या दोन्ही कुंटुंबांचा आर्थिक भार काही प्रमाणात हलका झाला आहे. या उपक्रमाचं हे सलग तिसरं वर्ष आहे. यापुर्वी सुद्धा या बाळगोपाळांनी रवी टिकम या आजारी तरूणाला आर्थिक मदत केली होती. सामाजिक उपक्रम राबवित असल्याने सध्या तारकर्ली पंचक्रोशित ते कौतुकाचा विषय ठरत आहेत.

या मुलांच्या कार्याचे थेट सौदी अरेबियातून कौतुक

दरम्यान या सामाजिक कार्याने प्रभावीत होवुन सध्या सौदी अरेबियात स्थायीक असलेले ग्लोबल मालवणी सामाजिक संस्थेचे मार्गदर्शक प्रदिप तोंडवळकर यांनी या मुलांना रोख ५ हजार रूपयांचं बक्षिस पाठवलो. प्रत्येकी ५०० रूपये या सरासरीने हे बक्षिस या बाळगोपाळांमध्ये वितरित करण्यात आलं.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.