ETV Bharat / state

'कसणाऱ्यालाही मदत मिळाली पाहिजे हे शासनाचे धोरण'

author img

By

Published : Oct 19, 2020, 3:15 PM IST

Updated : Oct 19, 2020, 3:22 PM IST

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधितांना योग्य त्या सुचना दिल्या.

पाहणी करताना पालकमंत्री सामंत
पाहणी करताना पालकमंत्री सामंत

सिंधुदुर्ग - जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी (दि. 19 ऑक्टोबर) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. खारेपाटण, कासार्डे, माणगाव खोरे आधी भागात त्यांनी भेट दिली आणि शेतकऱ्यांच्या बांधावरच शासकीय पंचनाम्याच्या प्रक्रियेची अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. खारेपाटण गावात मंदिरात बसून शेतीचे पंचनामे करणाऱ्या महसूल यंत्रणेचा पंचनामा करतानाच येथील तलाठी रमाकांत डगरे यांच्यावर कारवाई करून तत्काळ बदलीचे आदेश प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना दिले आहेत.

बोलताना पालकमंत्री उदय सामंत

जिल्ह्यात 25 टक्के क्षेत्र बाधित झालेले आहे. वेळ पडल्यास निकष बदलून शासन मदत जाहीर केली जाईल. नव्या बदललेल्या निकषाचा परिणाम कोकणातील शेतकऱ्यांवर होत असेल तर मुख्यमंत्र्यांना माहिती देऊ. तसेच कसणाऱ्यालाही मदत मिळाली पाहिजे हे सरकारचे धोरण असल्याचे यावेळी बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात परतीच्या पावसाने येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावी पूर आल्यामुळे भातशेतीचे अधिकच नुकसान झाले आहे. यामध्ये काही शेतकऱ्यांचे भात हे पुराच्या पाण्यात वाहून गेले तर काही ठिकाणचे भात पावसाच्या पाण्याने कुजून गेले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज (सोमवार) पालकमंत्री उदय सामंत यांनी खारेपाटणसह जिल्ह्यातील भात शेतीच्या नुकसानीची पाहणी केली.

पालकमंत्री सामंत म्हणाले, शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करताना ज्या काही त्रुटी अधिकाऱ्यांना येत आहेत. त्या दुर करण्याच्या सूचना देखील शेतकऱ्यांच्या बांधावर उपस्थित राहून अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कोकणात बऱ्याच ठिकाणी दुसऱ्याच्या मालकीचे शेत कसणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. याबाबत आपण कृषी मंत्री, महसूल मंत्री व मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून शेतकरी बांधवाना देखील नुकसान भरपाई मिळण्यासठी प्रयत्न करणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या भात शेतीची झालेल्या नुकसानीची भरपाई ही योग्य वेळी दिली जाईल, असेही महाराष्ट्र सरकारच्या वतीने पालकमंत्री सामंत यांनी शेतकऱ्यांना सांगितले. निसर्ग चक्रीवादळात पूर्वीचे निकष बदलून मदत दिलेली आहे. शेती नुकसानीच्या बाबतीतही वेळ पडल्यास सरकार असा निर्णय घेईल, असेही ते यावेळी म्हणाले. जमीन मालकासोबतच ती जमीन कसत असलेल्या शेतकऱ्याला देखील मदत मिळाली पाहिजे यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मंत्री सामंत म्हणाले.

दरम्यान, आज पालकमंत्री उदय सामंत यांनी खारेपाटण येथे शेताच्या बांधवरच शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली. यावेळी मंदिरात बसून कागदी पंचनामे करणाऱ्या महसूल व कृषी कर्मचारी यांच्यावर ताशेरे ओढत नाराजी व्यक्ती केली. तर अधिकाऱ्यांनी जबाबदारीने प्रत्यक्ष शेतावर जाऊनच पंचनामे करावेत. यामध्ये कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल,अशा सक्त सूचनाही वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व प्रशासकीय यंत्रणेला पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिल्या.

यावेळी येथील तलाठी रमाकांत डगरे यांच्या तक्रारीचाच पाढा शेतकऱ्यांनी वाचला. तसेच पालकमंत्री सामंत यांच्या प्रश्नांना तलाठी डगरे उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यामुळे या तलाठ्यांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश मंत्री सामंत यांनी यावेळी दिले.

हेही वाचा - उद्धव ठाकरे निष्क्रिय मुख्यमंत्री... राणेंचे महाविकास आघाडीवर टीकास्त्र

Last Updated : Oct 19, 2020, 3:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.