ETV Bharat / state

मंत्री राठोड यांचा गुन्ह्यात हात, तर धनंजय मुंडे टोकाचे निर्लज्ज; निलेश राणेंचा घणाघात

author img

By

Published : Feb 20, 2021, 11:39 AM IST

Updated : Feb 20, 2021, 11:59 AM IST

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांचा घडलेल्या क्राईममध्ये कुठेतरी हात आहे, म्हणूनच ते गायब आहेत. कॅबिनेट बैठकीलाही ते उपस्थित राहत नाहीत. मुख्यमंत्री देखील त्यांच्यावर नाराज आहेत. ही आत्महत्या नाही तर हत्याच आहे, हे संजय राठोडच गायब राहून सिद्ध करत असल्याचा आरोपही राणे यांनी यावेळी केला.

माजी खासदार निलेश राणे
माजी खासदार निलेश राणे

सिंधुदुर्ग - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून आता माजी खासदार निलेश राणे यांनी देखील निशाणा साधला आहे. मंत्री संजय राठोड यांचा या घडलेल्या गुन्ह्यामध्ये हात आहे, त्यामुळे ते गायब आहेत. तर धनंजय मुंडे टोकाचे निर्लज्ज असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. तसेच मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एकाला घरी नेऊन मारलं तरी त्यांच्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे हे सरकार महिलांना सोडाच कुणालाही न्याय देऊ शकत नसल्याची टीकाही निलेश राणे यांनी केली आहे. ते सिंधुदुर्गात बोलत होते

निलेश राणेंचा घणाघात

ही आत्महत्या नाही तर हत्याच

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांचा घडलेल्या क्राईममध्ये कुठेतरी हात आहे, म्हणूनच ते गायब आहेत. कॅबिनेट बैठकीलाही ते उपस्थित राहत नाहीत. मुख्यमंत्री देखील त्यांच्यावर नाराज आहेत. ही आत्महत्या नाही तर हत्याच आहे, हे संजय राठोडच गायब राहून सिद्ध करत असल्याचा आरोपही राणे यांनी यावेळी केला.

सरकारकडून अनेक प्रकरणात लपवा-लपवी-

सुशांतसिंग राजपूत प्रकरण असेल किंवा दिशा सालीयान प्रकरण आजही सरकार लपवा लपवी करत आहे. पूजा चव्हाण प्रकरणापूर्वीही त्यांनी आपल्या मंत्र्यांना वाचवले असल्याचाही आरोप त्यांनी केला. त्यामध्ये धनंजय मुंडे यांना सरकारने वाचवले. जितेंद्र आव्हाड यांनी एका इंजिनिअरला घरात नेऊन मारले. त्यांच्यावर आजही गुन्हा दाखल झालेला नाही. एफआयआर मध्ये कुठेच मंत्री नसतात, हे लपवायच काम करतात. त्यामुळे हे गायब राहत असल्याची टीका त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर केली.

सामान्य माणसाने हा गुन्हा केला असता तर एका दिवसात एफआयआर दाखल होते, असे सांगतानाच महाराष्ट्र स्वतःच्या बापासरखा असल्यासारखं वागायचे, स्वतःही घाणेरडी लफडी करायची आणि विरोधकांना तडीपार करण्याची धमकी द्यायची, हे या सरकारचे काम असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. तसेच कुठेतरी त्यांचे मीटर चालू आहेत. त्याच्यावरच त्यांचे सरकार चालू असल्याचा आरोपही निलेश राणे यांनी यावेळी केला.

धनंजय मुंडे टोकाचे निर्लज्ज-

धनंजय मुंडे हे टोकाचे निर्लज्ज आहेत म्हणून त्यांनी राजीनामा दिलेला नाही. खरं नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. यांनी आपले दुसरे लग्न निवडणूक आयोगापासून लपवले. एरव्ही अस झाले तर कारवाई होते. मात्र शरद पवार यांनीही त्यांच्यावर कारवाई केली नाही. त्यांच्या बचावासाठी राष्ट्रवादीचे नेतेही उतरले आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.

Last Updated : Feb 20, 2021, 11:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.