ETV Bharat / state

Boat Fire : सिंधुदुर्गमधील देवगड समुद्रात मच्छीमार नौकेला आग - समुद्रात मच्छीमार नौकेला आग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड समुद्रात मच्छीमार नौकेला आग ( Fishing boat caught fire ) लागली. मच्छिमार नौकेला अचानक आग लागल्यामुळे ( Fishing boat caught fire in Devgad sea ) मच्छिमारांनी आपला जीव वाचविण्यासाठी समुद्रात झेप घेतली. अन्य नौकांनी घटनास्थळी जात मदतकार्य केल्यामुळे आग आटोक्यात आली. या घटनेत जीवित हानी टळली आहे.

Boat Fire
Boat Fire
author img

By

Published : Dec 25, 2022, 9:18 PM IST

सिंधुदुर्गमधील देवगड समुद्रात मच्छीमारी नौकेला लागलेली आग

सिंधुदुर्ग : देवगड समुद्रात मोठी दुर्घटना घडली आहे. एका मच्छिमार नौकेला आग ( Fishing boat caught fire in Devgad sea ) लागली असून मच्छिमार बांधवानी आपला जीव वाचविण्यासाठी समुद्रात झेप घेतली. अन्य नौकानी घटनास्थळी जात मदतकार्य केले आणि आग ( Fishing boat caught fire ) आटोक्यात आणली आहे.

नौकेला लागली अचानक आग : देवगड बंदरातील मच्छीमारीसाठी गेलेली गणपत निकम यांची पुण्यश्री नौका 22 वाव खोल समुद्रात मच्छीमारी करत होती. यावेळी अचानक नौकेने पेट घेतल्याने नौकेचे मोठे नुकसान झाले आहे. सदर घटना रविवारी घडली असून घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी भर समुद्रात आपल्या नौकांसह धाव घेत नौकेला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. तब्बल चार तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास मच्छिमार बांधवांना यश आले असले तरी नौकेचे मोठे नुकसान झाले आहे.

मच्छीमारांचा जीव वाचला : मिळालेल्या माहितीनुसार पुण्यश्री नौका शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास खोल समुद्रात मच्छीमारी करण्यासाठी गेली होती. सुमारे 22 वाव मध्ये मच्छिमारी करत असताना अचानक नौकेला आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नौकेवरील खलाशांनी प्रयत्न केले मात्र त्यांना यश आले नाही. अखेर आग भडकतच गेली. आग नियंत्रणात येत नसल्याचे मच्छीमार बांधवांच्या लक्षात येताच नौकेवरील मच्छीमार बांधवांनी खोल समुद्रात उड्या घेत आपले जीव वाचविण्याचा प्रयत्न केला.

अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण : ही घटना समजल्यानंतर स्थानिक मच्छिमार बांधवानी आपल्या नौका घेऊन समुद्रात धाव घेतली. चार तासाच्या अथक परिश्रमानंतर स्थानिक मच्छीमार ग्रामस्थ यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. नोकेवरील आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर जळीत नौकेला देवगड बंदरात आणण्यासाठी इतर मच्छीमार बांधवांनी शर्तीचे प्रयत्न केले. देवगड मधील आनंदवाडी बंदर आणि आजुबाजुचे मच्छीमार बांधव महेश सागवेकर, बापू सागवेकर, हितेश हरम, आकाश हरम बाबू वाडेकर अक्षय हरम, चेतन पाटील नागेश परब बाबू कदम आधी मच्छीमार बांधवांनी आग विझवण्यासाठी मदत केली.

दोन जणांना किरकोळ जखम : नौकेला बंदरात आणल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत नौकेला किनाऱ्यावर आणण्यास शर्तचि प्रयत्न केले. या दुर्घटनेत नौका मालक गणपत निकम यांचे मोठे नुकसान झाले आहे. आग विझवताना दोन मच्छीमार बांधवांच्या पायाला भाजल्यामुळे स्थानिक ग्रामीण रुग्णालयात अधिक उपचार करण्यासाठी पोलिसांच्या गस्ती नौकेतुन नेण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.