ETV Bharat / state

सिंधुदुर्गातील 9 वर्षीय विजयची त्याच्या अनोख्या कलागुणांमुळे सर्वत्र चर्चा

कोकणातील मुलांमध्ये अनेक कला दडलेल्या आहेत. वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावातील ९ वर्षांचा विजय तुळसकर हा असाच अनेक कला अवगत असलेला मुलगा सध्या सर्वत्र चर्चेत आहे.

author img

By

Published : Jul 10, 2021, 3:58 PM IST

विशेष बातमी
विशेष बातमी

सिंधुदुर्ग - कोकणातील मुलांमध्ये अनेक कला दडलेल्या आहेत. वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावातील ९ वर्षांचा विजय तुळसकर हा असाच अनेक कला अवगत असलेला मुलगा सध्या सर्वत्र चर्चेत आहे. इयत्ता तिसरी मध्येच त्याला ११११ पर्यंतचे पाढे अगदी तोंडपाठ आहेत. पाकिस्तान, चायना, नेपाळ, अमेरिकेसह २० देशांची राष्ट्रगीतेही तो चागंल्या ताला-सुरात गातो. या मुलाची अफाट बुद्धिमत्ता सर्वांनाच चकित करणारी आहे.

सिंधुदुर्गातील 9 वर्षीय विजयची त्याच्या अनोख्या कलागुणांमुळे सर्वत्र चर्चा

चक्क ११११ पर्यंतचे पाढे तोंडपाठ
हार्मोनियम वादनात तर त्याने अफलातून प्रभुत्व मिळवले आहे. तो वेगवेगळ्या प्रकारे हार्मोनियम वाजवतो. मराठी, हिंदी, इंग्रजी बरोबरच स्पॅनिश भाषाही बोलतो, असा त्याच्या वडिलांचा दिनेश तुळसकर यांचा दावा आहे. विजय तुळसकर सिंधुदुर्गातील तुळशीवृंदावनासाठी प्रसिद्ध असलेल्या वेंगुर्ले तुळस गावातील जैतीर मंदीरा शेजारीच राहतो. त्याचे वडील दिनेश तुळसकर हे आपल्या वृद्ध आई, बायको आणि तीन मुलासंह संसाराचा गाडा चालवत आहेत. दिनेश तुळसकर यांचा गावात टेलरींगचा व्यवसाय आहे. त्यातूनच ते आपल्या तीनही मुलांचा शिक्षणाचा खर्च भागवतात. विजय नुकताच इयत्ता तिसरीतून चौथीत गेला आहे. मात्र तिसरीत असतानाच त्याने चक्क ११११ पर्यंतचे पाढे तोंडपाठ केलेत. हे सर्व पाढे तो इग्लिशमध्ये न चुकता सुफरफास्ट गतीने बोलून दाखवतो, असे त्याचे वडील सांगतात.

विशेष
हार्मोनियम उलट्या बाजूने वाजताना विजय

स्पॅनिश भाषा तर त्याला चांगलीच अवगत
जर्मन, इटालीयन भाषाही तो सध्या शिकत आहे. स्पॅनिश भाषा तर त्याला चांगलीच अवगत झाली आहे, अशी माहिती त्याची बहीण जागृती तुळसकर हिने दिली. विजयला हे एवढे ज्ञान काही जादूने प्राप्त झालेले नाही तर त्यासाठी त्याने इंटरनेटचा वापर केला आहे. विविध विषयांची पुस्तके वाचून तो आपल्या ज्ञानाची भुक बागवत आहे. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अ‍ॅपच्या माध्यमातून तो या भाषा शिकतो, अशी माहितीही त्याच्या बहिणीने दिली. विजयच्या दोन्ही बहीणीसुद्धा खुप हुशार आहेत. दोघीही संगित शिकत आहे. उत्कृष्ट किर्तन देखील करतात. जागृती सांगते आमचे बाबा तबला विशारद आहेत आणि मी कीर्तन करते, त्यामुळे आमच्या घरातच कलेचे वातावरण आहे. त्यातून त्याच्यात हार्मोनियमची आवड निर्माण झाली. तो वाचतो तेच लिहितो त्यानंतर त्याच्या ते लक्षात राहते. असेही जागृती हिने सांगितले.

विशेष
झोपून हार्मोनियम वाजताना विजय

हार्मोनियमवर त्याचा हातखंडा
त्याचे संगीत कलेवर प्रचंड प्रेम आहे. हार्मोनियम वादनात तर त्याचा हातखंडा असून नव नवे प्रयोग तो करत असतो. हार्मोनियम तो उलट्या बाजूने, झोपुन कशाही पद्धतीने वाजवू शकतो. अगदी कमी वयात त्याने स्वरांवरील ज्ञान प्राप्त केले आहे. तो गातो देखील अशी माहिती त्याचे वडील दिनेश तुळसकर यांनी दिली. दरम्यान कोकणात विजय तुळसकर यांच्यासारखी कोकणात अलौकिक कला व नयन असलेली मुले अनेक आहेत. त्यांना गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची.

हेही वाचा - नितीन गडकरी यांच्या खासदारकीला नाना पटोलेंचे न्यायालयात आव्हान; सुनावणी ६ ऑगस्टला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.