ETV Bharat / state

जंगली हत्तींच्या बंदोबस्तासाठी दोडामार्गमध्ये राबवली जाणार पकड मोहीम

कोल्हापूर आणि दोडामार्गमध्ये उपद्रव करणाऱ्या हत्तीसाठी कोल्हापूर आणि दोडामार्ग सीमेवर घाटकरवाडी येथे 600 हेक्टर क्षेत्रावर हत्ती पार्क उभारण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याच्या सुचना कोल्हापूर मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन आणि उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना देण्यात आल्या.

sindhudurg
सिंधुदुर्ग
author img

By

Published : Jun 20, 2020, 9:19 PM IST

सिंधुदुर्ग - दोडामार्ग तिलारी खोऱ्यात हत्ती नुकसानीचे सत्र सुरूच असताना आज सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांनी हत्तीबाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन समस्या जाणून घेतल्या. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी हत्ती पकड मोहीम राबवण्याची एकमुखी मागणी केली.

जंगली हत्तींच्या बंदोबस्तासाठी दोडामार्गमध्ये राबवली जाणार पकड मोहीम

यावेळी वनमंत्री संजय राठोड यांच्याशी फोनवरून संपर्क साधून परिस्थितीची माहिती देण्यात आली. कोल्हापूर आणि दोडामार्गमध्ये उपद्रव करणाऱ्या हत्तीसाठी कोल्हापूर आणि दोडामार्ग सीमेवर घाटकरवाडी येथे 600 हेक्टर क्षेत्रावर हत्ती पार्क उभारण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याच्या सुचना कोल्हापूर मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन आणि उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना देण्यात आल्या. याबैठकीला हत्तीबाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोडामार्ग तिलारी खोऱ्यात सध्या सहा हत्तींचा कळप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या फळबागा तसेच शेती उद्ध्वस्त करत आहेत. येथील शेतकऱ्यांवर हल्ले करण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे येथील शेतकरी भयभीत झाले आहेत. त्यामुळे उपद्रव करणाऱ्या हत्तींना पकडून हत्ती पार्कमध्ये सोडण्यात येईल. त्यामुळे हत्ती पार्क मोहीम पर्यटन वाढीसही फायदेशीर असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.