ETV Bharat / state

सिंधुदुर्ग : नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डाॅ.पी.जी दीक्षित

author img

By

Published : Oct 25, 2020, 3:12 PM IST

जिल्ह्यात उभारणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीसाठी प्रभारी अधिष्ठाता म्हणून डॉ. पी.जी दीक्षित यांची संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांनी नियुक्ती केली आहे. डॉ.पी.जी. दिक्षीत सध्या मिरजमधील विभाग प्रमुख प्राध्यापक न्याय वैद्यकशाळा या ठिकाणी कार्यरत होते.

डाॅ.पी.जी दीक्षित
डाॅ.पी.जी दीक्षित

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात उभारणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीसाठी प्रभारी अधिष्ठाता म्हणून डॉ. पी.जी दिक्षीत यांची संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांनी नियुक्ती केली आहे. अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली. डॉ.पी.जी. दीक्षित सध्या मिरजमधील विभाग प्रमुख प्राध्यापक न्याय वैद्यकशाळा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय याठिकाणी कार्यरत होते. त्यांच्या या नव्या नियुक्तीनंतर त्यांना मूळ पदावरून कार्यमुक्त करण्यात आले आहे.

प्रशासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांच्या अधिपत्याखाली, सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासनाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित रुग्णालय निर्माण करण्यास तत्वत: मान्यता दिली आहे. सिंधुदुर्ग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय निर्माण करण्याच्या दृष्टीने शासन/केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणे, हे अधिष्ठाता यांचे कार्य आहे. तसेच या इमारतीसाठी जागा हस्तांतरण, आरोग्य सेवा सुधारणे ही महत्त्वाची कामे त्यांच्यापुढे आहेत.

तसेच यासाठी भारतीय आयुर्विज्ञान परिषद, राष्ट्रीय वैद्यक परिषद येथे अर्ज दाखल करणे आणि केंद्र शासनाची मान्यता प्राप्त करणे, आदी कामे गतीने होण्याकरीता डॉ.पी.जी.दिक्षीत यांची प्रभारी अधिष्ठाता म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.

डॉ.पी.जी.दिक्षीत यांना ओरोस येथील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी 23 ऑक्टोबरपासून कार्यमुक्त करण्यात येत आहे. असे संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांनी नियुक्ती पत्रात म्हटले आहे. डॉ.पी.जी.दिक्षीत यांच्या नियुक्तीनंतर केंद्र व राज्य सरकारच्या महाविद्यालयीन योग्य त्या पुर्तता जलद गतीने होतील असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.