सिंधुदुर्ग - मालवण तालुक्यातील तळाशील समुद्र किनारी 40 फूट लांबीचा महाकाय व्हेल मासा मृत अवस्थेत सापडला आहे. हा मासा सडलेल्या अवस्थेत असल्याने तळाशील समुद्र किनारी मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरू लागली आहे. यामुळे मृत व्हेल माशाची प्रशासनाने लवकरात लवकर विल्हेवाट लावावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर अनेक व्हेल मासे मृत अवस्थेत सापडत आहेत. समुद्रात होणारी बेसुमार मासेमारी आणि यांत्रिक बोटीच्या माध्यमातून होणारी एलईडी मासेमारी या प्राण्यांच्या जीवावर बेतत असल्याचे जाणकार लोकांचे मत आहे.
कोकणातील समुद्रात दुर्मिळ जीवांचा होणारा मृत्यू सध्या समुद्र जीवप्रेमी आणि अभ्यासक यांच्या चिंतेचा विषय बनत आहे.