सिंधुदुर्ग - जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा भारतासह राज्यातही दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. 3 हजारांच्या वर लोकांना महाराष्ट्रात आत्तापर्यंत लागण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरीभागासह आता ग्रामीण भागातही वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत.
कुडाळमधील नेरूर ग्रामपंचायतीनेही कोविड-१९ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय योजना सुरु केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून नेरूर ग्रामपंचायत प्रवेशद्वारानजिक सॅनिटायझर कक्षाची निर्मिती केली आहे. गावातील नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी निर्जंतुकीकरण केले जात आहे. प्रवेशद्वारावर सॅनिटायझर कक्षातून सर्वांना प्रवेश दिला जात आहे.