ETV Bharat / state

विरोधी पक्षनेत्यांप्रमाणे मी वैफल्यग्रस्त नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या पंचनाम्यामधून सुमारे 10 कोटी रूपयांचे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे. किनारी भागातील मच्छिमार बांधव आणि हापूस व काजू बागायतीचे या वादळात मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करत या ठिकाणच्या नुकसानीचा आढावा घेतला आहे.

author img

By

Published : May 21, 2021, 2:11 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सिंधुदुर्ग - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. मालवण व वेंगुर्ला येथील नुकसानग्रस्त नागरिकांशी देखील त्यांनी चर्चा केली. कोकण आणि माझे नाते अतूट आहे ते कोणीही तोडू शकत नाही. विरोधी पक्षनेत्यांप्रमाणे मी वैफल्यग्रस्त नाही असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच कोकणवासीयांनी राज्याला होता होईल तेवढी मदत करू असे आश्वासन त्यांनी दिले.

प्रतिक्रिया - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पंचनाम्यामधून सुमारे 10 कोटी रूपयांचे नुकसान -

चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या पंचनाम्यामधून सुमारे 10 कोटी रूपयांचे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे. किनारी भागातील मच्छिमार बांधव आणि हापूस व काजू बागायतीचे या वादळात मोठे नुकसान झाले आहे. वीज वितरण कंपनीचे देखील कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्या चे समोर आले आहे. काही भागांमध्ये आजही वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही. तर किनारी भागामध्ये अनेक गोड्या पाण्याच्या विहिरी मध्ये समुद्राचे खारे पाणी गेल्याने या भागातील लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करत या ठिकाणच्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. यावेळी त्यांच्या समोर स्थानिक मच्छीमार नागरिकांनी आपली व्यथा मांडताना सरकारने आपल्याला भरघोस मदत करावी अशी मागणी केली आहे.

जिल्ह्यात 5,901 घरांची अंशतः पडझड तर 20 घरे पूर्णपणे जमीनदोस्त -

जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्याने झालेल्या नुकसानीचे 80 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत . जिल्ह्यात 5,901 घरांची अंशतः पडझड झाली आहे तर 20 घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत . यामुळे 10 कोटींचे नुकसान झाले आहे. मच्छिमारांचे 2 कोटी, जिल्हा परिषद शाळा तसेच आरोग्यकेंद्र इमारतींचे 10 कोटी, शेतकऱ्यांचे 10 कोटी, वीज महावितरणचे 40 कोटी असे मिळून जिल्ह्यात एकूण 72 कोटींचे नुकसान झाले आहे. उद्या 21 रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे दोघेही सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी येत आहेत.

हेही वाचा - ७० वर्षांपूर्वी देशातून नामशेष झालेला प्राणी पुन्हा दिसणार; कुनो अभयारण्य स्वागतासाठी सज्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.