सिंधुदुर्ग - शिवसेना आमदार वैभव नाईक ( Shivsena MLA Vaibhav Naik ) यांच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात ( Kudal Police Station ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीदरम्यान जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुडाळ नगरपंचायतीची सोमवारी (दि.14 फेब्रुवारी) नगराध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यावेळी आमदार वैभव नाईक ( Shivsena MLA Vaibhav Naik ) यांनी महाविकास आघाडीच्या नगरसेवकांना आपल्या गाडीत बसवून कुडाळ नगरपंचायतीच्या आवारात आणले. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडविली. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीदरम्यान नगरपंचायत आवारात अन्य कार्यकर्त्यांच्या गाड्यांना मज्जाव करण्यात आला होता. मात्र, यावेळी आमदार वैभव नाईक यांची गाडी पोलिसांनी आत सोडताच भाजाप कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी आमदार नाईक यांची गाडी रोखली. यावेळी भाजप, शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने आले. यामुळे राजकीय तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यामुळे पोलिसांनी आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेना, काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - Sindhudurg BJP And Shiv Sena : कुडाळमध्ये भाजपा कार्यकर्ते आणि शिवसेना आमदार वैभव नाईक आमने-सामने